वांद्र्यातील क्रिस्टल मॉलच्या अनधिकृत गाळ्यांवर कारवाई

  Bandra
  वांद्र्यातील क्रिस्टल मॉलच्या अनधिकृत गाळ्यांवर कारवाई
  मुंबई  -  

  वांद्रे लिंकिंग रोडवरील 'क्रिस्टल पॅरेडाईज मॉल'च्या चौथ्या मजल्यावरील अनधिकृत गाळ्यांवर महापालिकेने कारवाई केली आहे. या मॉलमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याचे आढळल्यानंतर येथील काही गाळ्यांवर महापालिकेने कारवाई केली. मागील आठवड्यातही या मॉलच्या काही गाळ्यांवर कारवाई करण्यात आली होती. गच्चीवरील अनधिकृत बांधकामाचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे न्यायालयाच्या निकालानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

  वांद्रे पश्चिम येथील लिंकिंग रोडवरील 'क्रिस्टल पॅरेडाईज' या पाच मजली मॉलमध्ये विकासकाने नियमबाह्य बांधकाम केल्याचे 2015 मध्ये उघडकीस आले होते. त्यानंतर महापालिकेने अनधिकृत गाळ्यांचे बांधकाम आणि गच्चीवरील अतिक्रमणासंबंधी नोटीस जारी केली होती. त्यानंतर या मॉलमधील चौथ्या मजल्यापर्यंतच्या गाळ्यांतील अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले.


  हेही वाचा

  झिका पसरतोय, काळजी घ्या...


  मागील आठवडयात पाचवा मजला व गच्चीवरील बांधकाम वगळता चौथ्या मजल्यावरील सर्व अनधिकृत बांधकामांवर एच/पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली. चौथ्या मजल्यावर प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर लीना मोगरे यांची जिम होती. परंतु विकासकाने फसवणूक केल्यामुळे मोगरे यांनी ही जागा सोडून दिली. हा गाळा अनेक महिन्यांपासून बंद असतानाही महापालिकेच्या कारवाईनंतर ‘मोगरे यांच्या जीमवर कारवाई’ अशा प्रकारच्या बातम्या पसरल्या होत्या. परंतु प्रत्यक्षात हे गाळे विकासकाच्या ताब्यात होते आणि त्यानेच यात नियमबाह्य बांधकाम केले होते. त्यामुळे या अनधिकृत गाळ्यांवर महापालिकेच्या पथकाने हातोडा चालवला.


  हेही वाचा

  लांबी वाढवलेल्या दोन कार आरटीओच्या ताब्यात


  या मॉलमधील गाळ्यांवर यापूर्वी कारवाई करण्यात आली होती. परंतु काही कारवाई शिल्लक होती, ती कारवाई या आठवड्यात करण्यात आली आहे. चौथ्या मजल्यापर्यंत असलेल्या अनधिकृत गाळ्यांवर ही कारवाई करण्यात आलेली आहे. गच्चीवरील अनधिकृत बांधकामांवरही न्यायालयाच्या निर्णयानंतर कारवाई केली जाईल, असे सहायक आयुक्त शरद उघडे यांनी स्पष्ट केले आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.