Advertisement

जुहुमधल्या प्रसिद्ध 'एस्टेला' हॉटेलवर पालिकेचा हातोडा


जुहुमधल्या प्रसिद्ध 'एस्टेला' हॉटेलवर पालिकेचा हातोडा
SHARES

जुहूमधील एस्टेला हॉटेलच्या अनधिकृत बांधकामावर मंगळवारी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने कारवाई केली. महापालिकेने 600 चौरस फुटाच्या बांधकामावर हातोडा चालवत हे बांधकाम जमीनदोस्त केले. 

एस्टेला हॉटेलच्या मालकाने काही दिवसांपूर्वी काँग्रेस आमदार नितेश राणे यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा नोंदवला होता. त्याआधी स्थानिक रहिवाशांच्या मागणीवरुन खुद्द माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मागणी केली होती.


कोफा हॉटेलचे बांधकाम तोडले 

जुहू तारा रोडवरील एस्टेला हॉटेलसह येथील कोफा हॉटेलच्या बांधकामावर देखील कारवाई करण्यात आल्याची माहिती के/ पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे. या हॉटेलच्या 850 चौरस फुटाच्या अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


रामी इंटरनॅशनलवरही कारवाई

जुहू तारा रोडवरील रामी इंटरनॅशनल हॉटेलच्या 700 चौरस फुटाच्या अनधिकृत बांधकामावर कारवाईकरून येथील भाग मोकळा करण्यात आला. या भागातील अनधिकृत बांधकामाची तक्रार येण्याची वाट न पाहता जिथे दिसेल तिथे कारवाई केली जाईल, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

उपायुक्त किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, 5 कामगार, 1 जेसीबी आणि स्थानिक पोलीस आदींच्या मदतीने केल्याची माहिती त्यांनी दिली. 




हेही वाचा

पालिकेची दिवसाला वॉर्डातल्या एकाच अनधिकृत बांधकामावर कारवाई!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा