Advertisement

पालिकेतला 'सिंघम'!


SHARES

भायखळा - बेकायदा बांधकामांवर करडी नजर...फेरीवाल्यांचा थरकाप...ना गुंडांची भीती, ना राजकारण्यांचा दबाव. ही कमाल आहे पालिकेच्या सिंघमची. या सिंघमचं नाव आहे उदयकुमार शिरुरकर. पालिकेच्या बी विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तपदाची सूत्रं त्यांनी हाती घेतली आणि विभागातल्या बेकायदा बांधकाम करणाऱ्यांची पाचावर धारणच बसली. मदनपुरा, नागपाडा, पायधुनी, मस्जिद बंदर, अब्दुल रेहमान स्ट्रिट कधीकाळी अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचं वर्चस्व असलेला हा भाग. पण इथे कारवाई करताना शिरूरकर यांनी कोणतीही भीड बाळगली नाही.

अंडरवर्ल्ड कनेक्शनमुळे मदनपुरा, पायधुणी परिसरातल्या फेरीवाल्यांवर कारवाई करणं म्हणजे महाकठीण काम. पण इथे बेधडकपणे कारवाई करण्याचं धाडस दाखवलं ते शिरूरकरांनी. नाखुदा मोहल्ला परिसरात तर गेल्या 40 वर्षांत अनधिकृत बांधकाम आणि फेरीवाल्यांवर कधीच कारवाई झाली नव्हती. शिरूरकरांच्या रूपानं या बेकायदा बांधकामाच्या दहशतीवर पहिला हातोडा पडला.

पालिका अधिकारी म्हटलं की भ्रष्टाचारी, अकार्यक्षम अशीच प्रतिमा आपल्यासमोर उभी रहाते. पण शिरूरकरांनी मात्र याला छेद देत पालिकेचा सिंघम अशीच आपली प्रतिमा निर्माण केली आहे. सामान्य मुंबईकरांमध्येही आणि फेरीवाले, बेकायदा बांधकामं करणाऱ्या गुंडांमध्येही. या पालिकेतल्या सिंघमच्या कर्तबगारीला मुंबई लाइव्हचा सलाम.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा