Advertisement

रिक्षा प्रवासासाठी मोजावे लागणार अधिक पैसे, जाणून घ्या नवे दर

ही भाडेवाढ येत्या २२ नोव्हेंबरपासून लागू करण्यात येणार आहे.

रिक्षा प्रवासासाठी मोजावे लागणार अधिक पैसे, जाणून घ्या नवे दर
SHARES

पुणेकरांना आता रिक्षा प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहे. पुणे जिल्ह्यात रिक्षा दरात भाडेवाढ करण्याचा निर्णय परिवहन विभागानं (Pune RTO) घेतला आहे. ही भाडेवाढ येत्या २२ नोव्हेंबरपासून लागू करण्यात येणार आहे.

पहिल्या दिड किलोमीटरसाठी आतापर्यंत १८ रुपये द्यावे लागत होते. मात्र आता त्यामध्ये ३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता पहिल्या दीड किलोमीटरसाठी २१ रुपये मोजावे लागणार आहेत.

इंधन दरवाढ, महागाईच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून दरवाढीची मागणी रिक्षा संघटनांकडून सुरू होती. खटुवा समितीच्या शिफारस लागू करण्याची मागणी रिक्षा चालक संघटनांनी केली होती. त्यानंतर आता परिवहन विभागानं ही दरवाढ लागू केली आहे.

पहिल्या दिड किलोमीटरसाठी आतापर्यंत १८ रुपये द्यावे लागत होते. मात्र आता त्यामध्ये ३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता पहिल्या दीड किलोमीटरसाठी २१ रुपये मोजावे लागणार आहेत. पहिल्या दीड किलोमीटर नंतरच्या प्रत्येक किलोमीटरला आतापर्यंत १२.३१ रुपये पैसै मोजावे लागत होते.

आता त्यामधे १.६९ रुपये पैशांची वाढ करण्यात आली आहे. आता प्रत्येक किलोमीटरसाठी १४ रुपये मोजावे लागणार आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात रात्री बारा ते पहाटे पाच या कालावधीत २५ टक्के अधिक भाडे रिक्षासाठी मोजावे लागणार आहे. तर जिल्ह्याच्या इतर भागामधे याच कालावधीत रिक्षासाठी चाळीस टक्के अधिक भाडे मोजावे लागणार आहे.

येत्या २२ नोव्हेंबरपासून नवे दर रिक्षा प्रवासासाठी लागू होणार आहेत. त्यामुळे नव्या दरांप्रमाणे मीटरचे सेटिंग बदलून घेणे रिक्षाचालकांना बंधनकारक राहणार आहे. जवळपास सहा वर्षानंतर रिक्षा दरवाढ करण्यात आली आहे.



हेही वाचा

मुंबईतील ९०% पेक्षा जास्त कोविड-१९ बेड रिकामे

पालिकेच्या ई वॉर्डचा मोबाईल लायब्ररी व्हॅन खरेदीचा प्रस्ताव

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा