Advertisement

झाडं छाटणीची परवानगी मिळणार घरबसल्या, पालिकेच्या अ‍ॅपवर सुविधा

आता घरबसल्या सोसायटीतील झाडांच्या छाटणीची परवानगी मिळणार आहे.

झाडं छाटणीची परवानगी मिळणार घरबसल्या, पालिकेच्या अ‍ॅपवर सुविधा
SHARES

आता घरबसल्या सोसायटीतील झाडांच्या छाटणीची परवानगी मिळणार आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने पालिकेच्या मोबाइल अ‍ॅपवर (MCGM 24×7) झाडं छाटणीच्या परवानगीसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे मुंबईकरांना पालिका विभाग कार्यालयात झाडं छाटणीची परवानगी मिळवण्यासाठी जाण्याची गरज भासणार नाही.

मुंबईत कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याने विभाग कार्यालयात जाऊन वृक्ष छाटणीची परवानगी घेणे सोसायटय़ा, खासगी जागांच्या मालकांना शक्य होणार नाही. त्यामुळे मोबाइल अ‍ॅपवर (MCGM 24×7) झाडं छाटणीच्या परवानगीसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

दरवर्षी पावसाळ्यात झाडांच्या फांद्याची छाटणी करण्यासाठी पालिकेने कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. मात्र गृहनिर्माण सोसायटय़ा, खासगी जागेतील झाडांच्या फांद्यांची छाटणी संबंधित मालकांना करावी लागते. मृत झालेली वा कीड लागलेली धोकादायक झाडं पावसाळ्यात उन्मळून पडून अपघात होण्याची शक्यता अधिक असते.

झाडांची छाटणी, मृत व धोकादायक झाडांची विल्हेवाट पालिकेच्या कंत्राटदारामार्फत केली जाते. मात्र त्यासाठी संबंधितांना पालिकेच्या विभाग कार्यालयाकडे अर्ज करावा लागतो. आवश्यक शुल्क भरल्यानंतर सात दिवसात वृक्ष छाटणीची प्रक्रिया केली जाते. मात्र विभाग कार्यालयात जाऊन अर्ज करणे सध्याच्या स्थितीत ज्यांना शक्य नाही, त्यांच्यासाठी पालिकेने या मोबाईल अ‍ॅपवर ही सुविधा उपलब्ध केली आहे.



हेही वाचा -

धक्कादायक! लाॅकडाऊनमध्ये क्षुल्लक कारणांवरून पत्नीला तोंडी तलाक

 
नियमांचे उल्लघंन करणाऱ्या 13 हजार 758 जणांवर पोलिसांनी नोंदवले गुन्हे




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा