Advertisement

भाभा रुग्णालय कात टाकणार!


भाभा रुग्णालय कात टाकणार!
SHARES

पश्चिम उपनगरातील वांद्रे, सांताक्रूझच नाही, तर माहीम भागातील रुग्णांसाठीही भाभा रुग्णालयातील वैद्यकीय सेवा-सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे रुग्णालयाच्या विस्ताराची मागणी गेल्या काही वर्षांपासून जोर धरू लागली होती.

याच पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंबई भाजपाचे अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी भाभा रुग्णालयातील गैरसोयी दूर करण्यासाठी याचा विस्तार करण्यात यावा, अशी मागणी पालिका आयुक्तांकडे केली आहे. मंगळवारी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी या प्रकल्पाला तत्वत: मान्यता दिली. आता लवकरच या रुग्णालयाचा विस्तार करण्यात येणार आहे. यावेळी रुग्णालयाचा विस्तार कशाप्रकारे करता येईल, याचा अहवाल एका महिन्यात सादर करण्याचे निर्देशही संबधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.


अत्याधुनिक सुविधा येणार

पश्चिम उपनगरात कुपरनंतर वैद्यकीयदृष्ट्या सुसज्ज असणारे रुग्णालय उभे राहण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. चार एफएसआय मिळाल्यास येथे नवीन इमारत बांधणेही शक्य होणार असल्याचे आशिष शेलार यांनी निदर्शनास आणले. शेलार यांनी रुग्णालयाला भेट देऊन इथल्या सोयी-सुविधांचा आढावा घेऊन तयार केलेला अहवालही आयुक्तांपुढे सादर केला. या वेळी माजी उपमहापौर अलका केरकर आणि पालिकेचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे उपस्थित होते.



या रुग्णालयात एकूण 436 खाटांची सुविधा उपलब्ध आहे. स्वाइन फ्लूच्या रुग्णांसाठी विशेष वॉर्डची आवश्यकता असताना या रुग्णालयात फक्त एकच बेड उपलब्ध आहे. या रुग्णालयात विशेष मान्सून वॉर्ड, डॉक्टर, रुग्णवाहिका, हुश व्हॅन इत्यादी महत्त्वाच्या सुविधा नसल्याने रुग्ण आणि कर्मचारी वर्गाला त्रास होतो. त्यामुळे या सुविधा तातडीने पुरवण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे.


कोणत्या नवीन सुविधा येणार...

  • एमआरआय
  • 10 बेडचे डायलिसिस सेंटर
  • 30 खाटांचे सुसज्ज एनआयसीयू
  • ह्युमन ब्रेस्ट मिल्क बँक
  • विशेष 10 खाटांच्या क्षमतेचा बर्न वॉर्ड
  • संक्रमण रोगांसाठी वेगळा वॉर्ड
  • ब्लड कम्पोनंट लॅब
  • टेलिमेडिसिन विभाग
  • स्कूल क्लिनिक
  • रुग्ण आणि नातेवाईकांकरिता राहण्यासाठी धर्मशाळा
  • बालचिकित्सा वॉर्ड प्ले रूम
  • मध्यमवर्गासाठी एसी आणि नॉन एसी रूमची सोय
  • 10 खाटांचे ईएमएस वॉर्ड


इतकंच नाही, तर अत्याधुनिक मायक्रोबायोलॉजी विभाग हार्मोनल एसआय लॅबसह एन्डोक्रिनोलॉजी विभाग सुरू करण्यात येणार आहे. तर, रुग्णालयात असलेल्या बाह्यरुग्ण विभागाची दुरुस्ती करण्यात येणार आहे. शस्त्रक्रियेसाठी 5 ओटी टेबल तयार करण्यात येणार आहेत. ऑर्थोपेडिक ओटी टेबलची संख्याही वाढवून 5 करण्यात येणार आहे. स्त्रीरोग तज्ज्ञ विभागातील टेबलची संख्याही वाढवून 5 करण्यात येणार आहे. आपातकालीन ओटी टेबलचीही संख्या वाढवण्यात येणार आहे. शिवायस, एक्स-रे मशिन्सची संख्याही वाढवून 4 करण्यात येणार आहे.




हे देखील वाचा - 

भाभा, शताब्दी आणि राजावाडीत सीटी स्कॅनसह एमआरआयची सुविधा


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा