Advertisement

सीएसएमटीनंतर वांद्रे स्थानकाला मिळणार झळाळी

सीएसएमटी स्थानकानंतर आता वांद्रे स्थानक आणि टर्मिनसचं रुपडं पालटणार आहे. दोन्ही स्थानकांचं लवकरच सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काळात पर्यटकांसाठी वांद्रे स्थानक आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे.

सीएसएमटीनंतर वांद्रे स्थानकाला मिळणार झळाळी
SHARES

पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे स्थानक आणि वांद्रे टर्मिनसला आता नवीन झळाळी मिळणार आहे. वांद्रे टर्मिनलसह स्थानकाचं लवकरच सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. मात्र, वांद्रे स्थानकाला हेरिटेजचा दर्जा आहे. त्यामुळे बांधकामात कोणत्याही प्रकारचा बदल अथवा बांधकामाला कुठलाही धोका न पोहोचवता हे काम करण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी स्थानकाला देखील एवन ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्यानुसार सीएसएमटी स्थानकाच्या मुख्य इमारतीचं सौंदर्यीकरण करण्याचं काम सुरू आहे.


असं असेल सौंदर्यीकरण

वांद्रे स्थानकाच्या सौंदर्यीकरणादरम्यान स्थानकात लाकडी आसनं बसवण्यात येणार आहेत. तसंच, रात्रीच्या वेळी वांद्रे स्थानक चमकदार दिसावं यासाठी कंदिलांच्या स्वरूपात एलईडी लाईट्स लावण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. वांद्रे स्थानकाचं काम ६ ते ८ महिन्यांत करण्यात येणार आहे.


कोटींचा निधी मंजूर

नुकताच, केंद्र सरकारनं अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात या कामासाठी ६६.६२ कोटींचा राखीव निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता लवकरच वांद्रे स्थानकाच्या सौंदर्यीकरणाचं काम करण्यात येणार आहे. तसंच, या निधीतून रेल्वेची इतर कामं देखील करण्यात येणार आहेत.


पर्यटकांसाठी केंद्रबिंदू

वांद्रे हे पश्चिम रेल्वे मार्गावरील महत्त्वांच्या स्थानकांपैकी एक आहे. त्यामुळे नेहमीच वांद्रे स्थानकात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यातच, आता वांद्रे स्थानकाचं सौंदर्यीकरण करण्यात येणार असल्यामुळे येथे प्रवाशांसह पर्यटकांची संख्या देखील वाढणार आहे.


हेही वाचा

पुणे आणि नाशिक मार्गावर धावणारी लोकल मुंबईत दाखल

चर्चगेट ते विरार स्थानकांवर २८१५ सीसीटीव्ही



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा