
दादर (dadar) येथे आज सकाळी प्लाझा थिएटर समोर बेस्ट (best) बसचा मोठा अपघात झाला आहे.
हा भीषण अपघात बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने झाल्याची प्राथमिक माहिती आहे. चालकाचा ताबा सुटल्याने बस थेट रस्त्यालगत असलेल्या फुटपाथवर धडकली. ही धडक इतकी भीषण होती की बसच्या (best bus) पुढच्या भागाचे मोठे नुकसान झाले आहे.
या भीषण अपघातात एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये रिषभ गुप्ता (साधारण 25 ते 30 वर्षे), सतीश वाघमारे (48 वर्षे), महेश डोईफोडे (50 वर्षे) इत्यादींचा समावेश आहे.
जखमींना (injured) तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी रिषभ गुप्ता यांच्या डोक्याला जबर मार लागला असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेस्ट बसने रस्त्याच्या कडेला असलेल्या बांधकाम स्थळावरील बॅरिकेड्सना धडक दिली आणि एका उत्खनन करणाऱ्या ट्रकला धडक दिली. हा ट्रक बसच्या पुढच्या काचेतून आरपार घुसला.
या अपघातात बेस्ट बसने एका दुचाकीला आणि एका टॅक्सीला धडक दिली आहे. या अपघातात दुचाकी थेट बसखाली चिरडली असल्याने दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.
अपघातात ॲक्टिव्हा इलेक्ट्रिक बाईकचा चालक आणि बस कंडक्टर जखमी झाले आहे. त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच बस चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
हेही वाचा
