हुश्श... बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

  Mumbai
  हुश्श... बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे
  मुंबई  -  

  बेस्ट प्रशासनाने गुरूवारी पूर्ण पगार देण्याचे आश्वासन दिल्यानंतर अखेर बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला आहे. बेस्टच्या कर्मचाऱ्यांना मे महिन्याचा केवळ अर्धाच पगार देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. याविरोधात बेस्ट वर्कर्स युनियनने 22 जूनच्या मध्यरात्रीपासून संपाची हाक दिली होती.

  आर्थिक अडचणीत सापडलेल्या बेस्ट उपक्रमातील 42 हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देताना बेस्ट प्रशासनाच्या नाकीनऊ आले आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासून कर्मचाऱ्यांना उशीरानेच पगार दिला जात आहे. त्यातच 19 जून रोजी प्रशासनाने मे महिन्याचा थकलेला केवळ अर्धाच पगार कर्मचाऱ्यांच्या खात्यात टाकला तसेच उर्वरीत अर्धा पगार कधी देणार हे देखील स्पष्ट केली नाही.

  हे वाचा - गुरुवारी मध्यरात्रीपासून बेस्ट कर्मचारी संपावर

  यामुळे नाराज बेस्ट वर्कर्स युनियनने औद्योगिक न्यायालयाने कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचे आदेश दिल्यानंतरही बेस्ट प्रशासन त्याचे पालन करत नसल्याचा आरोप केला. उर्वरीत अर्धा पगार न मिळाल्यास 22 जूनच्या मध्यरात्रीपासून संप करण्यात येईल, असा इशारा देखील दिला.

  अखेर बेस्ट प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत बुधवारी कर्मचाऱ्यांना 22 जून रोजी पगार देण्यात येईल, असे जाहीर केल्यामुळे संप मागे घेत असल्याचे बेस्ट वर्कर्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले. गुरुवारी रात्रीपर्यत कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात पगार जमा होईल, अशी आशा आहे. पण तसे न झाल्यास पुन्हा संपाची तयारी करावी लागेल, असेही शशांक राव यांनी स्पष्ट केले.

  हे देखील वाचा - आता मुंबईकरांसाठी ओलाची 'एसी' बस, बेस्टचं काय होणार?

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.