Advertisement

मुंबईत दुसऱ्या दिवशीही 'बेस्ट' विस्कळीत, आणखी 6 आगारांमधील चालक संपावर

पगारवाढ आणि सुविधांच्या मागण्यांसाठी मुंबईत बेस्टमधील कंत्राटी कामगारांनी संप पुकारला आहे.

मुंबईत दुसऱ्या दिवशीही 'बेस्ट' विस्कळीत, आणखी 6 आगारांमधील चालक संपावर
SHARES

बेस्टच्या घाटकोपर डेपोमधील कंत्राटी चालक काल सकाळपासून संपावर गेले आहेत. पगार वाढ, सुविधा, ओव्हर टाईम अशा विविध मागण्यांसाठी त्यांनी हा संप (BEST Bus Workers Strike) पुकारला आहे. हा संप आता अनेक आगारांमध्ये पसरला आहे. देवनार, आणि, मुलुंड, मुंबई सेंट्रल, मागाठाणे, गोराई, शिवाजी नगर, बॅकबे ,प्रतीक्षा नगर, धारावी, सांताक्रुज आणि मजास या आगारांमधील कंत्राटी चालकही आज संपावर गेले आहे. याचा फटका मात्र सामान्य मुंबईकरांना बसतोय.  

पगारवाढ आणि बेस्टच्या सुविधा अशा विविध सुविधांची मागणी  हे कंत्राटी कर्मचारी मागणी करत होते.या मागण्यांसाठी प्रज्ञा खजुरकर या सहकुटुंब आझाद मैदानात उपोषणाला बसल्या आहेत.त्यांना समर्थन देण्यासाठी आणि आझाद मैदानात त्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी या कंत्राटी कामगार संपावर गेले आहेत. आपल्या मागण्यांवर हे सर्व कर्मचारी ठाम आहेत, तसेच जोपर्यंत आपल्या मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत हा संप सुरुच राहिल असा आक्रमक पवित्राही कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.



हेही वाचा

मध्य रेल्वेवरील 'या' स्थानकांचा होणार कायापालट, कामांचा शुभारंभ

'या' 2 वंदे भारत एक्सप्रेस ठाणे आणि कल्याण स्थानकावर थांबणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा