Advertisement

कलिना इथं डबल डेकर बसला अपघात, २ जण गंभीर जखमी


कलिना इथं डबल डेकर बसला अपघात, २ जण गंभीर जखमी
SHARES

बेस्टच्या डबल डेकर बसला झालेल्या अपघातात २ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. कलिना येथील मिलिटरी कॅम्प आऊटपोस्ट इथं शनिवारी सकाळी ९.११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमध्ये दुचाकीस्वार जॉन ए. सीक्वेरा (५८) आणि त्यांच्या मागे बसलेला माणिलाल होनराज पनवेली (२६) हे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.


कसा घडला अपघात?

शनिवारी सकाळी बस क्रमांक ३१३ ही डबल डेकर बस सांताक्रूझ पूर्व स्थानकातून कुर्ला स्थानकाच्या दिशेनं जात होती. त्यावेळी कलिना इथं बस चालकाला बसमध्ये तांत्रिक बिघाड जाणवू लागल्यानं त्यांनं अर्जंट ब्रेक दाबला. त्यामुळं बस थेट झाडाला जाऊन आदळली. मात्र, त्याचवेळी दुचाकीस्वार जॉन सीक्वेरा बसच्याविरुद्ध दिशेने येत होते. अचानक बस समोर आल्याने त्यांना दुचाकी सावरता न आल्याने ते थेट बसवर येऊन आदळले.


हातापायाला दुखापत

या अपघातात दुचाकीस्वार सीक्वेरा आणि त्यांच्या मागे बसलेला माणिलाल होनराज पनवेली हे दोघेजण गंभीर जखमी झाले. जॉन यांच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झालं असून माणिलाल यांच्या डाव्या हाताला आणि पायाला फ्रॅक्चर झालं आहे.हेही वाचा-

Video- अग्निकांड! सायनमध्ये अज्ञातांनी १६ दुचाकी जाळल्या

गोरेगावमध्ये मुलाकडून अाईची हत्याRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा