Advertisement

बेस्ट कर्मचाऱ्यांना नाण्यांच्या स्वरूपात वेतन

बेस्टच्या तिजोरीत नाणी प्रचंड जमा झाली आहेत. परिणामी बेस्ट कर्मचाऱ्यांना अजूनही नाण्याच्या स्वरूपात वेतन देत आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांना नाण्यांच्या स्वरूपात वेतन
(Representational Image)
SHARES

बेस्ट उपक्रमानं आपली घटलेली प्रवासी संख्या वाढविण्यासाठी बसच्या तिकीट दरात कपात केली. त्यानुसार, विनावतानुकुलीत बसनं प्रवास करायचा असल्यास ५ रुपये व वातानुकूलित बसनं प्रवास करायचा असल्यास ६ रुपये असे तिकीट दर निश्चित करण्यात आले होते. दरम्यान या तिकीट दरामुळे बेस्टच्या तिजोरीत नाणी प्रचंड जमा झाली आहेत. परिणामी बेस्ट कर्मचाऱ्यांना अजूनही नाण्याच्या स्वरूपात वेतन देत आहे.

बेस्ट उपक्रमाची आर्थिक स्थिती किती नाजूक आहे, त्याचा दाखला कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारात पाहावयास मिळत आहे. बेस्ट कामगारांच्या पगारातील काही रक्कम सुट्ट्या नाण्यांच्या रूपात देण्याची पद्धत अजूनही सुरूच आहे. मार्चच्या पगारात तर त्याचा कळस गाठण्यात आला असून, तब्बल १५ हजार रुपयांची रक्कम ५ ते १० रुपयांच्या नाण्यांच्या व नोटांच्या स्वरूपात देण्यात आली आहे.

बेस्टच्या परिवहन सेवेतून उपक्रमाच्या खात्यात दैनंदिन स्तरावर ५ आणि १० रु.ची प्रचंड नाणी जमा होत असतात. ही नाणी बँकेत जमा करण्यासाठी एका बड्या सार्वजनिक बँकेशी करार करण्यास बेस्ट समितीने उपक्रमास मंजुरी दिली आहे. पण त्याची पूर्तता न झाल्याने जानेवारी, २०२१पासून नाण्यांचा साठा पडून आहे. नाण्यांचा हा डोंगर कमी करण्यासाठी कामगारांना पगारात नाणी देण्याची कल्पना अंमलात आली आहे. सन २०१९मध्ये नाण्यांच्या समस्येतून मुक्तता मिळविण्यासाठी उपक्रमाने हा तोडगा काढला होता.

यंदाचा मार्चचा पगार देताना कळस साधत बेस्टने तब्बल १५ हजार रु.ची रक्कम नाण्यांच्या रूपात दिली आहे. बेस्ट उपक्रमाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीतही त्यावर चर्चा झडली. बेस्ट उपक्रमातील मनुष्यबळ साधारण ४० हजारांपर्यंत आहे. त्यापैकी बहुतेकांना यापैकी नाण्यांच्या रूपात पगार दिला जातो. केवळ नाण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी म्हणून ती कामगारांच्या माथी मारली जात असल्याबद्दल टीकाही झाली आहे.



हेही वाचा -

  1. मुंबईत कोरोनाचा उद्रेक, गुरूवारी तब्बल 'इतके' नवे रुग्ण

  1. ठाणे जिल्ह्यात हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मद्यविक्री बंद


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा