Advertisement

बेस्टची उपाहारगृह ‘बेस्ट’ नाहीत


बेस्टची उपाहारगृह ‘बेस्ट’ नाहीत
SHARES

मुंबई - दहा-दहा, बारा-बारा तास काम करणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पोटात निकृष्ट, अस्वच्छ अन्नपदार्थ जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. अन्न आणि औषध प्रशासनानं (एफडीए) केलेल्या कारवाईतून बेस्टची उपाहारगृह बेस्ट नसल्याचं सिद्ध झालंय. बेस्टच्या उपाहारगृहात अस्वच्छ जागेत अन्न पदार्थ शिजवले जात असल्याची माहिती एफडीएला मिळाली होती. त्यानुसार एफडीएच्या दक्षता विभागानं नुकतीच बेस्टच्या 65 उपाहारगृहाची तपासणी केली. 65 पैकी केवळ 20 उपाहारगृहांचा परवाना घेण्यात आला असून 20 उपाहारगृह विना परवाना चालवण्यात येत असल्याचं स्पष्ट झालं. तर केवळ 13 उपाहारगृहांसाठीच नोंदणी केली असून 10 उपहारगृह विना नोंदणी असल्याचंही समोर आलंय.

दरम्यान विना परवानाधारक आणि विना नोंदणीधारक उपाहारगृहांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती एफडीएच्या दक्षता विभागानं दिलीय. तर स्वच्छतेच्या दृष्टीनं त्वरीत उपाययोजना करण्याचेही आदेश देण्यात आलेत.

बेस्टला एफडीएचा दणका
बेस्टची उपाहारगृह बेस्ट नसल्यानं एफडीएनं दंडात्मक कारवाई करत 22,500 रुपयांचा दंड वसूल केलाय. तर बेस्टला मोठा दणका म्हणजे एफडीएनं 6 उपहारगृांचे शटर डाऊन केले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा