आरटीओ होणार कॅशलेस!

मुंबई - लायसन्स, गाडीची फिटनेस चाचणी अशा कामांसाठी आपल्याला आरटीओ म्हणजे प्रादेशिक परिवहन मंडळ कार्यालयात जावं लागत होतं. नोकरी-व्यवसायातून वेळ काढून आरटीओत जाणं आणि एका फटक्यात काम न होणं, हा अनुभव तुम्हीही कधी तरी घेतलाच असेल. पण हे सगळं आता थांबणार आहे. कारण मार्च 2017 पासून आरटीओ आता कॅशलेस होणार आहे. त्यामुळे फक्त मोजक्याच कामांसाठी आरटीओत प्रत्यक्ष जावं लागेल. नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटरच्या मदतीनं 50 आरटीओ कार्यालयं जोडली जातायत. आरटीओ कार्यालयातली बरीचशी कामं दलालांमार्फत होतात. मात्र आता त्यांची पंचाईत होणार आहे. दुसरीकडे नागरिकांनी मात्र या निर्णयाचं स्वागत केलंय. कॅशलेस आणि ऑनलाइन पद्धतीमुळे वेळ वाचेल म्हणून सगळेच या पावलाचं कौतुक करतील. त्याच्या अंमलबजावणीची आता मुंबईकर आतुरतेने वाट बघतायत.

Loading Comments