Advertisement

नगरसेवकांनाही आता बायोमेट्रीक हजेरी

गुरूवारी मुंबई महानगर पालिकेच्या सभागृहात नगरसेवकांना बायोमेट्रीक हजेरी बंधनकारक करण्यासंबंधीचा प्रस्ताव ठेवण्यात आला. या प्रस्तावाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला आणि हा प्रस्ताव गुरूवारी सभागृहात मंजूर झाला.

नगरसेवकांनाही आता बायोमेट्रीक हजेरी
SHARES

मतदानाच्या दिवशी मत मागायला पक्षाचे उमेदवार येतात खरे, पण एकदा का त्यांना निवडून दिल्यानंतर ते काय आणि किती काम करतात याचा काही हिशोब नसतो. त्यातही आपल्या मुलभूत समस्या सोडवण्यासाठी आवश्यक असलेला असा लोकप्रतिनिधी म्हणजे नगरसेवक. हा नगरसेवक महापालिकेच्या सभागृहात, विविध समित्यांच्या बैठकीला जातो की नाही, गेला तर किती वेळ काम करतो हे कुणालाच काही माहित नसतं. 

आता मात्र कोणता नगरसेवक किती वेळा पालिकेत, सभागृहात हजर होता आणि त्याने किती वेळ काम केलं हे समजणार आहे. कारण आता नगरसेवकांनाही बायोमेट्रीक हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे.


सर्वपक्षीय नगरसेवकांचा पाठिंबा 

गुरूवारी मुंबई महानगर पालिकेच्या सभागृहात नगरसेवकांना बायोमेट्रीक हजेरी बंधनकारक करण्यासंबंधीचा प्रस्ताव ठेवण्यात आला. या प्रस्तावाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला आणि हा प्रस्ताव गुरूवारी सभागृहात मंजूर झाला. त्यामुळे आता प्रत्येक नगरसेवकाला बायोमेट्रीक हजेरी लावावी लागणार असून हा प्रशासनाचा एक चांगला निर्णय असल्याची प्रतिक्रिया पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना दिली आहे.


नगरसेवकांचा लेखाजोगा

या बायोमेट्रीक हजेरीमुळे आता नगरसेवक किती वाजता पालिकेत आले, किती वाजेपर्यंत थांबले, सभागृहात आणि विविध समित्यांच्या बैठकीला हजर होते का हे समजेल. पर्यायानं नगरसेवकांनी आपल्या मतदारांसाठी किती आणि काय काम केलं हे ही आता समजण्यास मदत होईल, असं म्हणत रविराजा यांनी हा प्रस्ताव गुरूवारी मंजूर झाल्याचं सांगितलं आहे.



हेही वाचा - 

Exclusive: धक्कादायक! आरेतल्या 'त्या' जागेवर ११ वर्षांत ३० वेळा लागली आग

मगनलाल चिक्कीचं उत्पादन थांबवण्याचे अादेश; एफडीएची कारवाई




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा