Advertisement

Coronavirus Updates: सरकारी कार्यालयांतील बायोमेट्रीक हजेरीला स्थगिती

कोरोना व्हायरसचा (coronavirus) प्रार्दुभाव वाढू नये म्हणून आता राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये बायोमेट्रीक हजेरीला (Biometric attendance) काही दिवस स्थगिती देण्यात आली आहे.

Coronavirus Updates: सरकारी कार्यालयांतील बायोमेट्रीक हजेरीला स्थगिती
SHARES

कोरोना व्हायरसचा (coronavirus) प्रार्दुभाव वाढू नये म्हणून आता राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये बायोमेट्रीक हजेरीला (Biometric attendance) काही दिवस स्थगिती देण्यात आली आहे. या कालावधीत कर्मचाऱ्यांची उपस्थिती पूर्वीप्रमाणे हजेरीपटावर नोंदवण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन विभागानं सोमवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. सराकारी कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रीक हजेरीला स्थगिती देण्याची मागणी केली होती. अनेक कर्मचाऱ्यांनी तर  बायोमेट्रीक हजेरी देण्यास नकार दिला होता. 

जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार झाला आहे. त्यामुळे आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण झाली असून मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोनाचा प्रसार झाला आहे. राज्यात रोज कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रसार राज्यातील कार्यालयांमध्ये होऊ नये तसंच राज्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांना त्याचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमधील  बायोमेट्रीक उपस्थिती प्रणालीचा वापर पुढील आदेश येईपर्यंत स्थगीत करण्यात येत आहे, असं या शासन निर्णयात म्हटलं आहे. 

याआधी मुंबई महापालिकेने (muBiometric attendancembai municipal corporation) कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसाठी सुरू केलेल्या  बायोमेट्रिक हजेरीला (biometric attendance) ३१ मार्च २०२० पर्यंत स्थगिती दिली आहे. या कालावधीत पालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची हजेरी नोंदवहीत नोंदवली जाणार आहे. याशिवाय मुंबई महापालिकेने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय (राणीची बाग) १५ मार्च २०२० पासून नागरिकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


हेही वाचा -

Coronavirus Update: अंधेरीतील सेव्हन हिल्स हाॅस्पिटल BMC च्या ताब्यात, ५०० खाटांची सुविधा होणार

Corona Virus : मुंबईत जमावबंदी कशासाठी? जाणून घ्या कलम१४४ म्हणजे काय




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा