Advertisement

बीएमसीकडून जन्म-मृत्यू दाखला लवकरच ऑनलाइन मिळणार

जन्म-मृत्यू दाखल्याची नोंदणी वा त्यातील चुकांची दुरुस्ती ऑनलाइन माध्यमातून करण्याचा निर्णय मुंबई पालिकेने घेतला आहे.

बीएमसीकडून जन्म-मृत्यू दाखला लवकरच ऑनलाइन मिळणार
SHARES

मुंबई महापालिकेकडून जन्म-मृत्यू दाखला लवकरच ऑनलाइन मिळणार आहे. तसंच जन्म-मृत्यू दाखले मराठी, इंग्रजीसोबतच उर्दू आणि अन्य भारतीय भाषांमध्येही देण्यात येणार आहेत.

जन्म-मृत्यू दाखल्याची नोंदणी वा त्यातील चुकांची दुरुस्ती ऑनलाइन माध्यमातून करण्याचा निर्णय मुंबई पालिकेने घेतला आहे. जन्म-मृत्यूचा दाखला मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेत जाऊन अर्ज भरावा लागतो. यामध्ये बराच वेळ जातो. तसंच दाखल्यातील चुकांची दुरुस्ती करण्यासाठीही वेळ लागतो. दाखले मिळविण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी विभाग कार्यालयांमध्ये खेटे घालावे लागतात. नागरिकांचा हा त्रास टळावा यासाठी आता जन्म-मृत्यू दाखले, तसेच त्यातील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी ऑनलाइनवर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.


जन्म-मृत्यू दाखल्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी समाजवादी पार्टीचे गटनेते रईस शेख यांनी केली होती. पालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी १४ दिवसांमध्ये याबाबत निर्णय घेण्यात येईल असं सांगितलं.


मुंबई महापालिकेकडून २००७ पूर्वी लिखित स्वरूपात जन्म-मृत्यू दाखले देण्यात येत होते. २००७ नंतर संगणकीय दाखले देण्यास सुरुवात झाली. मात्र २००७ पूर्वीचे दाखले मिळविण्यासाठी नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे हा प्रश्न सुटावा,  अशी मागणी रईस शेख यांनी केली आहे.



हेही वाचा

तब्बल अडीच तासांनी मुंबईतील वीजपुरवठा सुरुळीत

गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शिवशाही बसच्या संख्येत वाढ



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा