Advertisement

फिरता व्यवसाय करणाऱ्यांकडून शुल्क वसुली करा - कमलेश यादव

मुंबईत तीनचाकी, चारचाकी वाहनांद्वारे भाजीपाला, फळ, कांदे, बटाटे, खाद्यपदार्थ आदींची विक्री करणाऱ्यांकडून आता शुल्क वसूली करण्यात येणार आहे.

फिरता व्यवसाय करणाऱ्यांकडून शुल्क वसुली करा - कमलेश यादव
SHARES

मुंबईत तीनचाकी, चारचाकी वाहनांद्वारे भाजीपाला, फळ, कांदे, बटाटे, खाद्यपदार्थ आदींची विक्री करणाऱ्यांकडून आता शुल्क वसूली करण्यात येणार आहे. हा एक प्रकराचा फिरता व्यवसाय असून, हा व्यवसाय करणाऱ्यांना महापालिकेकडून परवाना देण्याबाबत पालिका कायद्यात तरतूद नाही. त्यामुळं महापालिकेनं यासंदर्भात नियम करून या वाहनांद्वारे फिरता व्यवसाय करणाऱ्यांना अधिकृत परवाना देऊन शुल्क आकारणी करावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक कमलेश यादव यांनी केली आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात, सार्वजनिक ठिकाणी, पदपथावर, रस्त्यालगत तीनचाकी, चारचाकी वाहनांवर भाज्या, फळे, कपडे, भांडी, सुका मेवा, फरसाण, खाद्यपदार्थ, चहा अशा अनेक वस्तू, खाद्यपदार्थ आदींची विक्री सर्रासपणे करण्यात येत आहे. मात्र, अशा वाहनांद्वारे फिरता व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना परवाना देण्याबाबत महापालिका कायद्यात तरतूद नाही. तसंच धोरणही नाही. त्याचप्रमाणं सध्या रखडलेल्या राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतही त्याबाबत काहीच तरतूद नाही. मात्र मुंबईत वाहनांद्वारे फिरता व्यवसाय करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे.

हे फिरता व्यवसाय करणारे मुंबई महापालिकेच्या विविध सेवासुविधा यांचा खुशाल लाभ घेतात. त्यांना कोणत्याही पद्धतीचं शुल्क आकारलं जात नाही. त्यामुळं महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळं मुंबई महापालिकेनं अशा वाहनांद्वारे फिरता व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना अधिकृत परवाना देण्यासाठी ठोस धोरण तयार करावे आणि या फिरत्या विक्रेत्यांना अधिकृत परवाने देऊन त्यांच्याकडून शुल्क वसुली करावी. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात भर पडेल, अशी मागणी नगरसेवक कमलेश यादव यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भातील ठराव पालिकेच्या सभेत एकमताने अथवा बहुमताने मंजूर झाल्यानंतर त्यास आयुक्तांकडून सकारात्मक अभिप्राय प्राप्त झाल्यावर अंमलबजावणीला सुरुवात करण्यात येणार आहे.



हेही वाचा -

हवाई प्रवासाच्या भाड्यात ३० टक्क्यांची वाढ

ठाण्यात प्रथमच ई-रिक्षा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा