Advertisement

BMC Budget 2021-22 : महापालिकेच्या २४ शाळांमध्ये सुरू होणार संगीत केंद्र

मुंबई महापालिका २४ शाळांमध्ये संगीत अकादमी सुरू करणार आहे.

BMC Budget 2021-22 : महापालिकेच्या २४ शाळांमध्ये सुरू होणार संगीत केंद्र
SHARES

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाच्या सुरुवातीला शिक्षण विभागाचे बजेट जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण विभागासाठी २,९४५ कोटींचे बजेट जाहीर झाले. मुंबई महापालिका २४ शाळांमध्ये संगीत अकादमी सुरू करणार आहे. या कामासाठी आवश्यक असणारे संगीत वाद्ये, फर्निचर आणि इतर वस्तू यांची खरेदी पक्रिया पूर्ण झाली आहे. 

मुंबई महापालिका इयत्ता ५ वी ते इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी २५ माध्यमिक शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणाऱ्या टिंकरींग लॅब (विचारशील प्रयोगशाळा) संदर्भात तरतूद जाहीर करण्यात आली. प्राथमिकसाठी २.६५ कोटी रुपये आणि माध्यमिकसाठी २.६५ कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे. 

संगीत केंद्र

मुंबई महापालिका २४ शाळांमध्ये संगीत अकादमी सुरू करणार आहे. या कामासाठी आवश्यक असणारे संगीत वाद्ये, फर्निचर आणि इतर वस्तू यांची खरेदी पक्रिया पूर्ण झाली आहे. तसंच, विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी २४ केंद्रशाळांतील संगीत अकादमीमध्ये मानधन देऊन संगती शिक्षकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. यामाध्यमातून विद्यार्थ्यांना अभिजात भारतीय संगीताचे विधिवत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

लोअर परेल येथील एन.एम.जोशी मार्ग महापालिकेच्या शाळेमध्ये साऊंडप्रुफ हॉल तयार केला जाणार आहे. इथं मॉडेल संगी केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. संगीत तज्ज्ञ मयुरेश पै यांच्या मार्गदर्शनाखाली हे करण्यात येणार आहे. यामध्ये अॅकॉस्टीक फलोरींग, स्मार्ट टीव्ही, प्रोजेक्टर, क्रोम कास्ट, वायफाय इत्यादी सेवा सुविधा पुरविण्यात येणार आहेत.



हेही वाचा - 

महापालिकेच्या शाळा होणार आता ‘मुंबई पब्लिक स्कूल’

BMC Budget 2021-22: आणखी २४ शाळांमध्ये दहावीपर्यंत शिक्षण मिळणार


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा