मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा २०२१-२२ (BMC Budget 2021) या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोषी यांनी बुधवारी महापालिकेच्या सभागृहात सादर केला. शिक्षण विभागासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात २९, ४५, ७८ कोटींची तरतूद केली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्थसंकल्पात यंदा १. १९ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. अर्थसंकल्पात दोषी यांनी मुंबईतील शाळांसंबंधी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. त्यापैकी एक घोषणा म्हणजे महापालिकेच्या शाळांचं नामकरण. मुंबई महापालिकेच्या शाळांचं नाव बदलून आता ‘मुंबई पब्लिक स्कूल’ असं करण्यात येणार आहे. त्यासाठी नवा लोगो देखील बनवण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या शाळांबद्दल जनतेच्या मनात सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी नामबदलाचा निर्णय घेतल्याचं संध्या दोषी यांनी यावेळी सांगितलं.
मुंबई महापालिकेकडून (bmc) सध्या प्राथमिक विभागाच्या ९६३ आणि माध्यमिक विभागाच्या २२४ शाळा चालवण्यात येत आहेत. मुंबईतील वेगवेगळ्या वाॅर्डांत वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या या शाळा नव्या धोरणाप्रमाणे त्यांच्या मूळनावासह मुंबई पब्लिक स्कूल (एमपीएस) नावाने ओळखल्या जातील. 'एमपीएस' नावाचा नवा लोगोही तयार करण्यात येणार आहे.
त्याशिवाय शिक्षण अर्थसंकल्पात पुढील वर्षभरात मुंबई महापालिका क्षेत्रात १० नव्या सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करण्याचा मानस ठेवण्यात आला आहे. सोबतच २४ शाळांमधील इयत्ता दहावीपर्यंतच्या शिक्षण सुविधा वाढवून या शाळा माध्यमिक दर्जाच्या करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांचं भाषिक कौशल्य विकसित करण्यासाठी २५ शाळांमध्ये जी क्लास अॅप्लिकेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी ५१ शिक्षक आणि २१० विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिल्याचीही माहिती अर्थसंकल्पातून देण्यात आली.
हेही वाचा- कोळी बांधवांसाठी खूश खबर, विधानसभा अध्यक्षांनी दिले ‘हे’ आदेश
शैक्षणिक अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे:
(bmc school name changes as mumbai public school in bmc education budget 2021)
हेही वाचा- शेवटी आपण ठरवायचं.. जाणता राजा, संजय मोनेंची पोस्ट वाचली का?