Advertisement

शेवटी आपण ठरवायचं.. जाणता राजा, संजय मोनेंची पोस्ट वाचली का?

डोंबिवलीतील मनसे पदाधिकाऱ्यांच्या राजीनामा सत्रावर सर्वच स्तरातून मतमतांतरे व्यक्त होत असताना अभिनेते संजय मोने यांनी देखील फेसबुक पोस्ट लिहून यावर आपलं परखड मत व्यक्त केलं आहे.

शेवटी आपण ठरवायचं.. जाणता राजा, संजय मोनेंची पोस्ट वाचली का?
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कल्याण-डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांनी एकापाठोपाठ एक करत राजीनामे दिल्याने सर्वच मराठी माध्यमांमध्ये ही बातमी चर्चेच्या केंद्रस्थानी होती. मनसेच्या (mns) बालेकिल्ल्याला खिंडार पडल्याचंही म्हटलं जात होतं. या राजीनामा सत्रावर सर्वच स्तरातून मतमतांतरे व्यक्त होत असताना अभिनेते संजय मोने यांनी देखील फेसबुक पोस्ट लिहून यावर आपलं परखड मत व्यक्त केलं आहे.

संजय मोने यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ज्या पक्षाचा फक्त एक आमदार आहे, त्या पक्षाच्या कुठल्याही पातळीवरच्या नेत्याने दुसऱ्या पक्षात प्रवेश केला की लगेच "मोठी बातमी"असा मथळा देऊन बातमी लिहिली किंवा बोलली जाते.. याचा अर्थ त्या पक्षाच्या "असण्याची" सगळे जण दखल घेतात..हो ना? याचा अर्थ सर्वसामान्य मतदारांनी लक्षात घ्यायला हवा.. 

या मधल्या "lock down"च्या काळात सत्ता हाताशी नसताना ज्यांनी तुम्हाला मदत (साहाय्य खरं तर)केली, ते जरा लक्षात ठेवा.. माझ्या मतदार संघात, जो स्वतः राज ठाकरे यांचाही आहे, नितीन सरदेसाई यांनी जे काही कष्ट केले, त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना त्याची पावती देणं हे आपलं कर्तव्य आहे.. कर्तव्य म्हटलं की उगाच जबाबदारी येते.. तर थोडा शब्दप्रयोग बदलतो, तर..आपला हक्क आहे असं समजा...

हेही वाचा- मनसेच्या बालेकिल्ल्यात नव्या शिलेदाराची निवड

तळटीप- मी कुठल्याही पक्षाची बाजू घेत नाहीये. फक्त परिस्थिती आणि अवस्था काय होती ते सांगतोय.. इतर अनेक ठिकाणी हीच परिस्थिती आणि अवस्था होती.. शेवटी आपण ठरवायचं आहे.. जाणता राजा (जो जाणतो)आणि नेणता राजा (जो आपल्याला हव्या त्या ठिकाणी-इप्सित स्थळी सुरक्षित नेतो) यात निवड करायची आहे.. बोटाला रंग लागला की मतदान असं समजू नका.. रंग लावायला बोट शिल्लक राहिलंय हे महत्वाचं.

असं म्हणत संजय मोने यांनी राजकीय विषयावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिवाय आपण कुठल्याही पक्षाची बाजू घेत नसल्याचंही स्पष्ट केलं.

डोंबिवलीतील मनसेचे माजी शहराध्यक्ष तसंच प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी कार्यकर्त्यांसह सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (shiv sena) प्रवेश केला. तर त्यांच्या पाठोपाठ मंगळवारी कल्याण-डोंबिवली महापालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते आणि गटनेते मंदार हळबे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये (bjp) प्रवेश केला. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या कल्याण ग्रामीण या मतदारसंघातील हे सर्व पदाधिकारी होते. कल्याण-डोंबिवलीत मनसेचा जनाधार वाढवण्यात या दोन्ही नेत्यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याची मोठी चर्चा झाली.

त्यानंतर राज ठाकरे (raj thackeray) यांनी अवघ्या २४ तासांत डोंबिवलीत नव्या शिलेदाराची निवड केली. मनोज घरत यांची पक्षाकडून डोंबिवलीच्या शहराध्यक्षपदी वर्षभरासाठी निवड करण्यात आली आहे.

(marathi actor sanjay mone reacts on mns chief raj thackeray influence on public)


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा