Advertisement

मुंबईतील रस्त्यांचं काँक्रिटीकरण लांबलं, निविदा महापालिकेकडून रद्द

सत्तास्थापन केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य खड्डेमुक्त करण्याची महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली होती.

मुंबईतील रस्त्यांचं काँक्रिटीकरण लांबलं, निविदा महापालिकेकडून रद्द
SHARES

सत्तास्थापन केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य खड्डेमुक्त करण्याची महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली होती. पावसाळ्यात मुंबईतील खड्ड्यांनी वाहनचालकांना जेरीस आणले होते आणि शहरांत अभूतपूर्व वाहतूककोंडी होत होती. मात्र, मुंबईतील सुमारे ४०० किमी लांबीच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने मागवलेल्या निविदांना अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने त्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेने ऑगस्ट २०२२ मध्ये ५ हजार ८०६ कोटींच्या निविदा मागवल्या होत्या. या पाच निविदांना अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने निविदा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या कामांसाठी आता पुन्हा नव्याने निविदा मागवण्यात येणार आहेत. त्यापूर्वी निविदांच्या अटी व शर्तींचे पुनर्विलोकन करण्यात येईल, तसेच गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता जलदगतीने कामे करणे, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करणे या दृष्टीने निर्णय घेऊन नवीन निविदा मागविणे संयुक्तिक ठरेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते सुधारणा व मुंबई महानगर पुढील एक वर्षात खड्डेमुक्त करण्याच्या दृष्‍टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेने सुमारे 400 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी एकूण पाच निविदा आल्या होत्या. यामध्ये शहर -1, पूर्व उपनगरे -1 आणि पश्चिम उपनगरे - 3 अशा एकूण पाच निविदांचा समावेश होता. या पाच निविदांमध्ये समाविष्ट असलेल्या कामांसाठी एकूण अंदाजित खर्च 5 हजार 806 कोटी रुपये इतका होता.



हेही वाचा

मुंबईकरांना न्यू ईयर गिफ्ट! मेट्रो २ अ आणि ७ चा दुसरा टप्पा जानेवारीमध्ये सेवेत

बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवा लवकरच सुरू होणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा