Advertisement

मुंबईतील सफाई कामगारांना मिळणार हक्काचं घर

स्वत:चं आरोग्य धोक्यात घालून मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या सफाई कामगारांना आता मुंबईतच हक्काचे घर मिळणार आहे.

मुंबईतील सफाई कामगारांना मिळणार हक्काचं घर
SHARES

मुंबई 'स्वच्छ व सुंदर' ठेवण्यासाठी सतत काम करणाऱ्या महापालिकेच्या सफाई कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता या सफाई कामगारांना मुंबईत हक्काचं घर मिळणार आहे. महापालिकेच्या वसाहतीमध्ये पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या सफाई कामगाऱ्यांच्या नावे सध्या ते राहत असलेली घरं 'प्रमाणित भाडेपद्धती'नं  देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून महापालिका आयुक्तांनी या निर्णयाला मंजुरी दिली आहे.

प्रमाणित भाडेपद्धत

महापालिकेच्या ८ नोव्हेंबर १९७१ च्या परिपत्रकानुसार बीआयटी चाळीमध्ये 'भाडेरहित' घरात राहणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन खात्यामधील चतुर्थश्रेणी कामगारांची घरं 'प्रमाणित भाडे पद्धतीत' परावर्तित करण्यात आली आहेत. तसंच, मुंबईत २००० पूर्वीपासून राहणाऱ्या रहिवाशांना पुनर्विकास योजनेत पक्की घरं मोफत व मालकी तत्त्वावर देण्यात येतात. परंतु, घनकचरा व्यवस्थापन खात्यातील जुनं पलटण रोड येथील वसाहतीतील कामगारांना १९४६ पासून राहत असूनही घरं प्रमाणित भाडेपद्धतीनं परावर्तित करण्यात आलेली नाहीत.

पिढ्यानपिढ्या वास्तव्य

'या सफाई कामगारांसाठी १ एप्रिल १९४६ च्या वास्तव्याची अट शिथील करून ती १ एप्रिल १९८५ करण्यात यावी व १ एप्रिल १९८५ पूर्वीपासून पालिका वसाहतीमधील एकाच सदनिकामध्ये वारसा हक्कानं पिढ्यानपिढ्या वास्तव्य करणाऱ्या सफाई कामगारांच्या नावे त्या सदनिका प्रमाणित भाडे पद्धतीनं परावर्तित करावीत', अशी मागणी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केली होती.

या मागणीसाठी त्यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना पत्र दिलं होतं. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी गटनेत्यांच्या बैठकीत मांडण्यात आला. त्यावेळी या प्रस्तावाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला तसंच, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी मान्यता दिली आहे.



हेही वाचा -

कांजूरमार्गच्या पर्यायाचं काय? मेट्रो कारशेड प्रकरणी उच्च न्यायालयाचा प्रश्न

रेड अलर्टमुळं मुंबई-ठाण्याताली शाळांना सुट्टी जाहीर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा