Advertisement

'मुंबई लाइव्ह' इम्पॅक्ट - अखेर कबुतर खाना झाला स्वच्छ!


'मुंबई लाइव्ह' इम्पॅक्ट - अखेर कबुतर खाना झाला स्वच्छ!
SHARES

दादरमध्ये असलेला कबुतर खाना आहे की गाईचा गोठा? असा प्रश्न पाहणाऱ्या प्रत्येकाला पडेल अशी कबुतरखाण्याची दुरावस्था झाली होती. मात्र, शनिवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी 'मुंबई लाईव्ह'ने याबाबतची बातमी प्रसिद्ध केल्यानंतर बातमीची दखल घेऊन महापालिका जी उत्तर विभागाने कबुतर खान्यात असलेल्या गाई हटवून स्वच्छता स्वच्छता केली.कबुतर खान्याच्या बाजूला पडलेला कचरा आणि बांधलेल्या गाईंमुळे हा कबुतर खाना गाईच्या गोठ्याप्रमाणे दिसत होता. गाईसाठी ठेवलेला चारा, गाईचे शेण हे कबुतर खान्याच्या सभोताली पडल्यामुळे कबुतर खाना अत्यंत गलिच्छ झाला होता.

कबुतर खान्याचा उल्लेख मुंबईच्या ऐतिहासिक वास्तूंमध्ये केला जातो. परंतु, गेल्या काही दिवसांत कबुतर खान्याची झालेली दुरवस्था पाहून भविष्यात कबुतर खाना इतिहास जमा होतो की काय? असा प्रश्न पडला होता. मात्र, पालिकेने 'मुबई लाइव्ह'च्या बातमीनंतर लागलीच पावलं उचलून तिथल्या गाई हटवल्या आहेत.हेही वाचा

दादरचा कबुतरखाना बंद करा - मनसे


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा