Advertisement

पालिकेचं मान्सूनपूर्व काम जोमात, पालिका आयुक्तांनी केली पाहणी

मुंबईतील नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम सध्या सुरू आहे.

पालिकेचं मान्सूनपूर्व काम जोमात, पालिका आयुक्तांनी केली पाहणी
SHARES

पावसाळा जवळ येत असताना, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मान्सूनशी संबंधित कामे हाती घेत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम सध्या सुरू आहे. गुरुवारी, १४ एप्रिल रोजी पालिका आयुक्त, इक्बाल सिंग चहल यांनी या कामांची पाहणी केली.

यावेळी मिठी नदीसह इतर नाल्यांचीही तपासणी करण्यात आली. वांद्रे कुर्ला संकुल परिसरातील बीकेसी कनेक्टर पुलाजवळील कॅनरा बँकेच्या कार्यालयासमोरील नदीच्या कामाची पाहणी करण्यात आले. याशिवाय, वांद्रे (पूर्व) येथील धीरूभाई अंबानी शाळेजवळील मिठी नदीच्या पश्चिमेकडील बाजूचीही पाहणी करण्यात आले. 

चहल यांच्या व्यतिरिक्त, उपस्थित इतर संबंधित अधिकाऱ्यांमध्ये अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, रेनवॉटर हार्वेस्टिंग विभागाचे मुख्य अभियंता अशोक मेस्त्री यांचा समावेश होता.

या आठवड्याच्या सुरुवातीला, मुंबई उपनगरचे पालकमंत्री, आदित्य ठाकरे यांनी सेंट झेवियर्स मैदान, गांधी मार्केट पंप आणि दादर येथील पावसाचे पाणी साठवून ठेवण्याच्या कामाचा आढावा घेतला.

सेंट झेवियर्स मैदानावरील पावसाचे पाणी साठवण्याच्या टाक्या, गांधी मार्केट पंपासह दादर येथील टाक्यांचे काम सुरू आहे.

त्यांच्या ट्विटमध्ये पुढे असे लिहिले आहे की, "माझी नम्र विनंती मान्य केल्याबद्दल मी MCGM चे आभारी आहे. आम्ही मुंबईतील इतर सखल भागात जसे की मिलन सबवे, जुहू, अंधेरी इत्यादी ठिकाणी अशा होल्डिंग टाक्या तयार करण्याचा विचार करत आहोत."



हेही वाचा

मुंबईकरांना दिलासा! १ मेपासून आता प्रत्येक घरात पाणी

जागतिक स्तरावर ‘वृक्ष नगरी’ म्हणून मुंबईची निवड

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा