Advertisement

तोडलेल्या 'त्या' बांधकामांची उपायुक्तांमार्फत तपासणी

ज्या नियमबाह्य अनियमितता आढळून आल्या आहेत, त्या दृष्टीने सर्व ७ परिमंडळांच्या उपायुक्तांनी तपासणी करावी व अशा अधिका-यांची आणि व्यवसायिक तक्रारदारांची नावे द्यावीत, असे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत.

तोडलेल्या 'त्या' बांधकामांची उपायुक्तांमार्फत तपासणी
SHARES

महापालिका क्षेत्रात गेले २ दिवस विविध आस्थापनांच्या परिसरातील नियमबाह्य बाबींविरोधात धडक कारवाई सुरु आहे. या आस्थापनांमध्ये ज्या नियमबाह्य अनियमितता आढळून आल्या आहेत, त्या दृष्टीने सर्व ७ परिमंडळांच्या उपायुक्तांनी तपासणी करावी व अशा अधिका-यांची आणि व्यवसायिक तक्रारदारांची नावे द्यावीत, असे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत.


अधिकारी-व्यावसायिकांचे संगनमत?

विभाग स्तरीय इमारत व कारखाने खात्यातील अधिकारी, सार्वजनिक आरोग्य खात्यातील अधिकारी, तसेच मुंबई अग्निशमन दलातील अधिकारी इत्यादींनी आपल्या कर्तव्यात कसूर केला आहे का? व्यवसायिक तक्रारदारांबरोबर अधिकारी-कर्मचा-यांचे संगनमत होते का? याबाबत सर्व ७ परिमंडळांच्या उपायुक्तांना तपासणी करण्याचे आणि अशा अधिका-यांची आणि व्यवसायिक तक्रारदारांची नावे जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


'15 दिवसांत पाहणी करा'

महापालिका क्षेत्रातील आस्थापनांना ज्या अटींवर या परवानग्या देण्यात आल्या आहेत, त्या सर्व अटींची पूर्तता त्यांच्या स्तरावर होत आहे अथवा नाही, विशेषत: अग्निशमन यंत्रणा आणि घ्यावयाची काळजी (Fire Codified Requirements)याची स्वत:हून पाहणी करावी. यानुसार त्यांच्या आस्थापनेतील जे बांधकाम किंवा ज्या बाबी अनधिकृत असतील, त्या पुढील १५ दिवसांत व स्वत:हून निष्कासित कराव्यात, असेही आदेश दिले आहेत. या बांधकामांनी मुदतीदरम्यान त्यांच्या परिसरातील अनियमिततांबाबत स्वत:हून कार्यवाही केली नाही, तर त्यांच्यावर मुदत संपल्यानंतर महापालिकेद्वारे पुन्हा धडक कारवाई करण्यात यावी, असेही बजावण्यात आले आहे.



हेही वाचा

एकाच दिवशी ३१४ अनधिकृत पब, रेस्टॉरंट बारवर कारवाई; ७ हॉटेल केले सील


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा