Advertisement

महापालिका आयुक्तांनी केली रेल्वे नाल्यांची पाहणी


महापालिका आयुक्तांनी केली रेल्वे नाल्यांची पाहणी
SHARES

मुंबईतील नाल्यांच्या सफाईची पाहणी केल्यानंतर आता महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी हार्बर मार्गावरील नालेसफाईची पाहणी केली. अजोय मेहता आणि मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी रेल्वेच्या विशेष बोगीतून हार्बर मार्गावरील नालेसफाईची पाहणी केली आणि पावसाळ्यापूर्वी ज्या भागातील नाल्यांची सफाई झालेली नाही, ती त्वरीत पूर्ण करण्याच्या सूचना रेल्वेला केल्या.


हे देखील वाचा 

- 'मुंबई लाइव्ह'च्या दणक्यानंतर नालेसफाईला सुरुवात


मुंबईतील नालेसफाईपैकी 60 टक्के काम पावसाळ्यापूर्वी केले जाणार आहे. त्यातील 65 टक्के नालेसफाईचे काम पूर्ण झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. नालेसफाईच्या कामांवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त तसेच शिवसेना कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि इतर महापालिकेतील समिती अध्यक्ष पाहणी करत आहेत. महापालिकेच्या हद्दीतील या नालेसफाईच्या कामांबरोबर रेल्वेच्या हद्दीतील नाल्यांची सफाई योग्य प्रकारे व्हावी म्हणून महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी गुरुवारी सकाळी हार्बर मार्गावरील नाल्यांची पाहणी केली.


हे देखील वाचा 

- यंदाही मुंबई तुंबणार?


यावेळी त्यांना काही नाले साफ झाल्याचे दिसून आले, तर काही ठिकाणी नालेसफाईच्या कामाला सुरुवातही झाली नसल्याचे आढळून आले. रेल्वेच्या हद्दीतील नाल्यांची सफाई ही रेल्वेच्या वतीने केली जाते. यासाठी होणारा खर्च हा महापालिकेकडून दिला जातो. यंदा रेल्वेला महापालिकेने 4.25 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या पाहणीमध्ये अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख आणि इतर संबंधित अधिकारीही यात सहभागी झाले होते.


हे देखील वाचा 

100 टक्के नालेसफाई कधीच होऊ शकत नाही - उद्धव ठाकरे

- नालेसफाईबाबत पारदर्शकतेचे पहारेकरी मूग गिळून


पाणी तुंबल्यास जबाबदार कोण!

पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेच्या हद्दीत सध्या एकूण १४० छोटे-मोठे नाले आहेत. यामध्ये कुर्ला कारशेडचा नाला सर्वात मोठा आहे. मात्र या नाल्याची सफाई योग्य रीतीने होत नसल्यामुळेच थोडासा पाऊस झाला तरी विशेषतः मध्य आणि हार्बर लाइन कोलमडण्याचे प्रकार घडत असल्याचे बोलले जाते.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा