Advertisement

खाजगी रुग्णालयातील 100 खाटा ताब्यात घ्या, महापालिका आयुक्तांचे निर्देश

मुंबई महानगरपालिकेच्या सर्व 24 विभागांमध्ये प्रत्येकी 100, यानुसार किमान 2 हजार 400 खाटा उपलब्ध होणार आहेत.

खाजगी रुग्णालयातील 100 खाटा ताब्यात घ्या, महापालिका आयुक्तांचे निर्देश
SHARES

मुंबई महापालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय विभागातील नर्सिंग होम व छोटी रुग्णालये यातील किमान 100 खाटा उपलब्ध करून घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी सर्व 24 विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. यापैकी किमान 10 टक्के खाटा या अतिदक्षता विभागातील (ICU) असाव्यात, असंही या आदेशात सांगण्यात आलं आहे.  

मुंबई महानगरपालिकेच्या सर्व 24 विभागांमध्ये प्रत्येकी 100, यानुसार किमान 2 हजार 400 खाटा उपलब्ध होणार आहेत. खाटा उपलब्ध करून घेताना त्या वेगवेगळ्या छोट्या रुग्णालयांमधील वा नर्सिंग होममधील असणार आहेत. उदाहरणार्थ एका विभागातीलएका नर्सिंग होममधील 50 खाटा, तर दुसऱ्या एखाद्या छोट्या रुग्णालयातील 50 खाटा याप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणच्या खाटा ताब्यात घ्यायच्या आहेत.

प्रत्येक विभागाने किमान 100 खाटा ताब्यात घ्यायच्या आहेत. यामधील 10 टक्के खाटा, या अतिदक्षता विभागातील असणे आवश्यक आहे. यामुळे मुंबई महापालिकेच्या 24 विभाग कार्यालयांकडे प्रत्येकी 100, याप्रमाणे एकूण 2 हजार 400 खाटा उपलब्ध होणार आहेत. यात 240 एवढ्या संख्येतील अतिदक्षता विभागातील खाटांचाही समावेश असणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष बैठकीदरम्यान महापालिका आयुक्तांनी सर्व २४ विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना हे निर्देश दिले आहेत. या बैठकीला अतिरिक्त महापालिका आयुक्त, सहआयुक्त, उपायुक्त यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.



हेही वाचा - 
खासगी नर्सिंग होम, रुग्णालय सुरू न केल्यास होणार कारवाई
नॉन एसी ट्रेनसाठी ऑनलाइन बुकिंगची वेळ जाहीर




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा