Advertisement

कोरोना रुग्णसंख्यावाढीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेचे नवे निर्देश, मास्क घालण्याबाबत...

कोरोना रुग्णसंख्यावाढीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकाकडून नवे निर्देश जारी करण्यात आले आहेत.

कोरोना रुग्णसंख्यावाढीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेचे नवे निर्देश, मास्क घालण्याबाबत...
(File Image)
SHARES

कोरोना रुग्णसंख्यावाढीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकाकडून नवे निर्देश जारी करण्यात आले आहेत. मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बुधवारी वर्षा निवासस्थावर बैठक पार पडली. त्यातील चर्तेनंतर बीएमसीने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्देश दिले आहेत.

राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 2526 सक्रीय रुग्ण आहेत. त्यामुळे पालिका पुन्हा एकदा कामाला लागली आहे. काही नवीन निर्देश देण्यात आले आहेत.

  • मुंबईतील कोरोना चाचणीची संख्या युद्धपातळीवर वाढवण्यात येणार आहे. तसेच टेस्टिंग लॅब आणि कर्मचाऱ्यांनी पूर्वतयारी करावी.
  • १२ ते १८ वयोगटातील लसीकरण वाढवावे, तसेच बुस्टर डोसची संख्याही वाढवावी.
  • जंबो कोविड सेंटर पुन्हा सज्ज करावेत. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना अलर्ट करावेत.
  • मालाड येथील जंबो कोविड सेंटर प्राधान्यानं सज्ज होणार
  • वॉर्ड वॉर रुम पुन्हा एकदा सक्रीय होणार
  • खाजगी रुग्णालयांनाही अलर्ट
  • मान्सूनच्या पार्श्वभूमीवर प्रतेयक रुग्णालयात आपातकालीन स्थितीची सज्जता आहे की नाही याबाबतचा आढावा घेतला जाईल.
  • मास्कबाबत टास्क फोर्स कडून निर्देश येईपर्यंत अद्याप कोणताही निर्णय नाही. टास्क फोर्सच्या निर्णायानंतर मास्कवर निर्णय घेण्यात येईल.

गेल्या 24 तासात मुंबईमध्ये 218 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईमध्ये सध्या 2526 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत 10,43,710 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे 98 टक्के इतकं आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी कालावधी 2355 झाला आहे. तसेच कोरोना वाढीचा दर 0.029% टक्के इतका आहे.



हेही वाचा

मुंबईकरांनो सावधान! मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा ५००च्या पार

मे महिन्यात कोविड रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याच्या प्रमाणात २३१% वाढ

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा