Advertisement

सफाई कामगारांचे महापालिकेविरोधात बेमुदत उपोषण


सफाई कामगारांचे महापालिकेविरोधात बेमुदत उपोषण
SHARES

भांडुप - कचरा वाहतूक श्रमिक संघाने शनिवारपासून पालिकेच्या भांडुप येथील एस वॉर्ड कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. साफसफाई करण्यासाठी मॅकेनिकल पॉवर स्विपिंग यांत्रिक झाडू सुरू करून, सुमारे 500 सफाई कामगारांना बेरोजगारीच्या उंबरठ्यावर पालिकेने नेले आहे, असा आरोप कामगारांनी केला आहे. या उपोषणाचा दुसरा दिवस असून वेळ पडल्यास आत्मदहन करू, असा तीव्र इशाराही कामगारांनी दिलाय. न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असे श्रमिक संघाचे चिटणीस विजय दळवी यांनी स्पष्ट केले.

"रस्त्यावरची साफसफाई करण्यासाठी पालिकेने सफाई कामगारांच्या रोजगाराचा विचार केला नाही. कामगार कायद्यान्वये सफाई कामगारांना संरक्षण असून सुद्धा त्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता कामगारांना काम नाकारले जात आहे. हा न्यायालयाचा अवमान असून सफाई कामकाजाच्या पद्धतीत कुठलाही बदल करू नये. सर्वांचा रोजगार चालू राहावा, जर कोणा कामगारांना काम नाकारले तर त्याविरोधात न्यायालयीन लढाई सुद्धा लढू," असे विजय दळवी यांनी सांगितले

आधुनिक पद्धतीची यांत्रिक झाडू आणल्याने एस विभाग(भांडुप), टी विभाग(मुलुंड), एन विभाग(घाटकोपर) आणि एम/पूर्व(गोवंडी) या विभागातील जवळजवळ पाचशे सफाई कामगारांवर बेरोजगारीची वेळ येणार असल्याने या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा