SHARE

मुंबई महापालिकेच्या एम पूर्व विभागातील अण्णाभाऊ साठे नगर व पीएमजी कॉलनीदरम्यान  मानखुर्द चिल्ड्रेन एड नाला आहे. या नाल्यावर परिसरातील नागरिकांच्या सुविधेसाठी पालिकेने ३५ मीटर लांबीचा पादचारी पूल बांधण्याचा प्रस्ताव मंजूर केला अाहे. मात्र या ठिकाणी ३५ अनधिकृत बांधकाम असल्यानं या पुलाचं काम रखडलं होता. बुधवारी महापालिकेच्या परिमंडळ ५ चे उपायुक्त भारत मराठे यांच्या नेतृत्वाखाली ही सर्व अनधिकृत बांधकामं हटवण्यात आली अाहेत. यामुळं पादचारी पुलाचं काम लवकरच मार्गी लागणार आहे. 


पोलिसांचं सहकार्य

 पालिकेचे ५४ कर्मचारी अाणि ३१ पोलिस यांच्या सहाय्याने ही सर्व अनधिकृत बांधकामं हटवण्यात पालिकेला यश आलं आहे. या कारवाईसाठी १ जेसीबी, १ पोकलेन, २ डंपर यांसह इतर आवश्यक वाहनं व साधनसामुग्रीचा वापरण्यात आल्याची माहिती पालिकेच्या एम पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास किलजे यांनी दिली. हेही वाचा - 

हिरे व्यापारी हत्याकांडात सातव्या आरोपीला अटक

शिक्षणात मानवी मुल्यांचा समावेश व्हावा- दलाई लामा
संबंधित विषय
ताज्या बातम्या