Advertisement

मेट्रो स्टेशनच्या बांधकामाआड येणाऱ्या बांधकामांवर कारवाई


मेट्रो स्टेशनच्या बांधकामाआड येणाऱ्या बांधकामांवर कारवाई
SHARES

दक्षिण मुंबईतील वरळी परिसरात नेहरू विज्ञान केंद्राजवळील मुंबई मेट्रोच्या प्रस्तावित स्थानकाच्या बांधकामच्या आड येणारी आणि इ-मोझेस मार्ग व सेनापती बापट मार्ग यांच्या जंक्शनवरील रखांगी चौकात असणारी १६ बांधकामं गुरूवारी पालिकेकडून करण्यात आलेल्या ध़डक कारवाईदरम्यान तोडण्यात आली आहेत. या बांधकामाचा वापर हा प्रामुख्यानं व्यवसायासाठी करण्यात येत असून या कारवाईदरम्यान महापालिकेला स्थानिकांच्या रोषाला व दगडफेकीच्या घटनांना सामोरं जाव लागले. 


पर्यायी जागा 

महापालिकेच्या जी-दक्षिण विभागाद्वारे करण्यात आलेल्या या कारवाईत तोडलेल्या १६ बांधकामामध्ये १५ दुमजली (Gr+1) व एका तीन मजली (Gr+2) बांधकामाचा समावेश आहे. ही बांधकामं तोडल्याने नेहरू विज्ञान केंद्र मेट्रो स्थानकाच्या बांधकामास गती मिळणार आहे. या बांधकामांशी संबंधितांना मुंबई मेट्रोद्वारे पर्यायी जागा देण्यात येणार असून यासाठी पालिकेचे ३० कर्मचारी घटनास्थळी कार्यरत होते. 



हेही वाचा - 

स्टेथोस्कोपच्या जागी हातात फळ आणि वजनकाटा

ठाणे मेट्रो आता गायमुखपर्यंत; कासारवडवली ते गायमुख मेट्रो-४ अ ला हिरवा कंदील




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा