Advertisement

अंधेरीतील अनधिकृत दुमजली वाहनतळ जमीनदोस्त


अंधेरीतील अनधिकृत दुमजली वाहनतळ जमीनदोस्त
SHARES

अंधेरी पूर्वेकडील मरोळ-मरोशी रोडलगत असलेल्या १३९० चौ. फुटांवर अनधिकृतरित्या उभारण्यात आलेलं दुमजली वाहनतळ मुंबई महापालिकेने जमीनदोस्त केलं. या ठिकाणी पाणपोई उभारण्याची परवानगी मे. चिंतामणी कमर्शिअल व्हेंचर्स यांना देण्यात आली होती. परंतु त्याऐवजी त्यांनी अनधिकृत वाहनतळ उभारल्याने ही कारवाई करण्यात आली.


नोटीस पाठवून कारवाई

संबंधित जागेवर पाणपोईऐवजी दुमजली वाहनतळ निदर्शनास आल्यामुळे महापालिकेच्या के पूर्व विभागाने धडक कारवाई करून मुंबई पोलिसांच्या सहकार्याने हे दुमजली वाहनतळ तोडलं. याआधी या अनधिकृत वाहनतळाविरोधात नोटीस पाठवून कारवाई देखील करण्यात आली होती, अशी माहिती के पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी दिली.


'अॅमिनीटी स्पेस'साठी राखीव

महापालिकेच्या के पूर्व विभागातील मरोळ-मरोशी रोड लगत असलेला १३९० चौरस क्षेत्रफळाचा भूखंड 'अॅमिनीटी स्पेस'साठी राखीव ठेवण्यात आला आहे. या भूखंडावरील काही भागात अधिकृतरित्या सार्वजनिक पाणपोई बांधण्यात आली होती. तसंच उर्वरित भागात दुमजली वाहनतळ उभारण्यात आलं होते.



हेही वाचा-

मजासवाडी पोलिस वसाहतीत दुरूस्तीच्या नावे मलमपट्टी; कंत्राटदाराच्या मुसक्या आवळल्या

टीबी रुग्णालयातील नर्स अचानक संपावर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा