Advertisement

जुहूतील मयूर इमारतीवर हातोडा


जुहूतील मयूर इमारतीवर हातोडा
SHARES

जुहूतील जेव्हीपीडी स्कीम ८ मधील मयूर इमारतीतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने हातोडा चालवला. या इमारतीतील एफएसआयच्या नियमांचं उल्लंघन करून अनधिकृत बांधकाम करण्यात आलं होतं. या अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवून ते तोडून टाकण्यात येत आहे.



जेव्हीपीडी क्रमांक ८ मधील १३ मजली मयूर इमारतीत अनधिकृत बांधकाम झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने इमारतीची पाहणी केली. या पाहणीमध्ये अनेक मजल्यांवर एफएसआयचं उल्लंघन करण्यात आल्याची बाब समोर आली. त्यामुळे या इमारतीतील अनधिकृत बांधकाम तोडण्यात आलं.

के-पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही धडक कारवाई करण्यात आली. इमारतीतील काही बांधकाम तोडून टाकण्यात आलं असून उर्वरीत बांधकाम तोडण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.



हेही वाचा-

यशराज स्टुडियोत बेकायदा बांधकाम, महापालिकेने बजावली नोटीस

शत्रुघ्न सिन्हा यांच्या इमारतीतील बेकायदा बांधकामावर हातोडा



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा