Advertisement

मुंबईतील बेकायदा बांधकामे बेधडक तोडा, शिवसेना आयुक्तांच्या पाठिशी- उद्धव ठाकरे

मुंबईतील बेकायदा बांधकामांवर महापालिका आयुक्तांनी कुठल्याही दबावाखाली न येता कारवाई करावी. शिवसेना त्यांच्या सोबत असेल. परंतु आयुक्तांनी संबंधित बांधकाम अधिकृत आहे की अनधिकृत याची खातरजमा करावी, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबईतील बेकायदा बांधकामे बेधडक तोडा, शिवसेना आयुक्तांच्या पाठिशी- उद्धव ठाकरे
SHARES

कोणत्याही बड्या नेत्याचा मुलाहिजा न बाळगता, त्यांच्या दबावाला बाजूला सारून मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी मुंबईतील बेकायदा बांधकामावर
बेधडक कारवाई करावी, शिवसेना त्यांच्यासोबत असेल, असं आश्वासन शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिलं.

कमला मिल कंपाऊंडमधील मोजोस बिस्ट्रो आणि वन अबोव्ह पबला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर महापालिकेने शहरातील बेकायदा बांधकामावर कारवाईला सुरुवात केली. ही कारवाई थांबवण्यासाठी काही राजकीय नेत्यांनी आयुक्तांना दबाव टाकणारे फोन केल्याची माहिती आयुक्तांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उघड केली. आयुक्तांच्या या गौप्यस्फोटामुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली. आयुक्तांना धमकावणारे राजकीय नेते नेमके कोण? शिवसेनेचा या कारवाईला पाठिंबा आहे का? यासंदर्भात उद्धव यांना विचारणा केल्यावर त्यांनी यावर आपलं मत व्यक्त केलं.

मुंबईतील बेकायदा बांधकामांवर महापालिका आयुक्तांनी कुठल्याही दबावाखाली न येता कारवाई करावी. शिवसेना त्यांच्या सोबत असेल. परंतु आयुक्तांनी संबंधित बांधकाम अधिकृत आहे की अनधिकृत याची खातरजमा करावी, असं उद्धव म्हणाले.


उद्धव यांचा भाजपला टोला

कमला मिल दुर्घटनेच्या एक दिवस अगोदर युवासेना नेते आदित्य ठाकरे कमला मिलमध्ये गेले होते, असे म्हणत विरोधकांनी त्यांच्यावर टीका सुरू केली. मात्र मंत्रालयाला आग लागण्याअगोदर मुख्यमंत्रीही तिथं होते. तेव्हा त्यांच्यावरही टीका करणार का? असा प्रश्न विचारून उद्धव यांनी भाजपावर टीका केली.


आरोपी दहशतवादी आहेत का?

कमला मिल प्रकरणातील आरोपी पबच्या मालकांना पकडण्यासाठी मुंबई पोलिसांना बक्षीस जाहीर करावं लागतं हे आश्चर्यकारक आहे. आरोपींच्या डोक्यावर इनाम ठेवायला ते काय दहशतवादी आहेत का? पबचे मालक सापडत नसतील तर पोलीस खातं नेमकं करतंय काय,' असे म्हणत उद्धव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला हाणला.

भीमा कोरेगावसंदर्भातील प्रश्न विचारल्यावर यासंदर्भात नंतर भूमिका मांडेन असे ते म्हणाले.



हेही वाचा-

कमला मिलमधील हॉटेल तोडताना दबाव आला; अजोय मेहता यांचा गौप्यस्फोट

अजोय मेहता यांची नार्कोटेस्ट करा: मनसेची मागणी


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा