• घाटकोपरमध्ये अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा
SHARE

घाटकोपर - साकीनाका-खैरानी रोड विभागाला जोडणाऱ्या जंगलेश्वर रोडच्या रुंदीकरणाला अडथळा ठरत असलेल्या पंधरा दुकानांवर मंगळवारी पालिकेच्या एन विभागाने तोडक कारवाई केली.

गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या स्थानिक राहिवाशांना भेडसावत होती. त्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ही दुकानं हटवण्याची प्रक्रिया मागील काही वर्षांपासून सुरू होती. या दुकानांना माहुल तसेच मुंबई उपनगरात काही ठिकाणी स्थलांतरित करण्याचा पालिकेचा प्रयत्न सुरू असला तरी याच परिसरात दुकानं बांधून हवीत अशी मागणी दुकानदारांनी केली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या