दादर येथील किर्तीकर मार्केटवर महापालिकेचा हातोडा


SHARE

कमला मिल कंपाऊंडमधील मोजोस बिस्ट्रो आणि वन अबोव्ह पबला लागलेल्या आगीनंतर खडबडून जाग आलेल्या मुंबई महापालिकेने शहरातील कानाकोपऱ्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा मारायला सुरूवात केली आहे. त्यानुसार महापालिकेच्या जी/ नाॅर्थ विभागाने शुक्रवारी दादर पश्चिमेकडील डी सिल्व्हा रोडवरील प्रसिद्ध किर्तीकर मार्केटमधील अनधिकृत बांधकाम तोडलं.सकाळी ११ वाजेच्या सुमारास जी/ नाॅर्थ विभागातील अतिक्रमणविरोधी पथकाने किर्तीकर मार्केटमधील अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरूवात केली. या कारवाईत महापालिकेने एकूण १२८ दुकानांवर हातोडा चालवला. ही कारवाई दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू होती.

या कारवाईत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दुकानाबाहेर वाढविलेले बांधकाम तसेच मोकळ्या जागेतील अतिक्रमण, अनधिकृत स्टॉल तोडण्यात आले. या अनधिकृत आणि वाढीव बांधकामामुळे मार्केटमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या ग्राहकांना चालण्यास अडथळा येत होता. रस्ता देखील अरुंद झाला होता, ही सर्व बांधकामे हटवून रस्ता मोकळा करण्यात आल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली.हेही वाचा-

गावदेवीत शेड पडून एकाचा मृत्यू, तर एकजण जखमी

हॉटेल्सवरील कारवाई पुन्हा सुरू, २ दिवसांत १३७ बेकायदा हॉटेल्सवर हातोडा


संबंधित विषय