Advertisement

रणजीत ढाकणेंवरील अतिक्रमणाचा भार हलका: निधी चौधरींच्या खांद्यावर टाकला भार


रणजीत ढाकणेंवरील अतिक्रमणाचा भार हलका: निधी चौधरींच्या खांद्यावर टाकला भार
SHARES

मुंबईत सध्या अतिक्रमण निर्मूलन विभागाची जबाबदारी समर्थपणे पेलणारे उपायुक्त रणजीत ढाकणे यांची अखेर बदली करण्यात आली आहे. ढाकणे यांची बदली परिमंडळ सहाच्या उपायुक्तपदी करून त्यांच्या खांद्यावरील अतिक्रमणाचा भार हलका करण्यात आला आहे. मात्र, ढाकणे यांच्या खांद्यावरील हा भार आता उपायुक्त (विशेष) निधी चौधरी यांच्यावर सोपवला आहे. सनदी अधिकारी निधी चौधरी सहआयुक्तपदावर असतानाही त्यांच्याकडे उपायुक्त (विशेष)पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या जबाबदारीसह अतिक्रमण निर्मूलन विभागाचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या सर्वांच्या बदल्या सोमवारपासून लागू होत असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.


अशा बदल्या

मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सोमवारी उपायुक्तांच्या बदल्या केल्या. यामध्ये परिमंडळ दोनचे उपायुक्त आनंद वाघ्राळकर यांची बदली परिमंडळ तीन पदी करण्यात आली आहे. तर परिमंडळ सहाचे उपायुक्त नरेंद्र बर्डे यांची बदली उपायुक्त दोनपदी करण्यात आली. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त रणजीत ढाकणे यांची बदली परिमंडळ सहाच्या पदी करण्यात आली आहे.


तरीही बदली...

महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त रणजीत ढाकणे यांनी अतिक्रमणांविरोधात धडक कारवाई करून अनेक बांधकामे व स्टॉल्स हटवली आहेत. तसेच फेरीवाल्यांनाही हटवतानाच आता त्यांच्यावरील दंड व शुल्काची रक्कमही वाढवण्याचे धोरण बनवले आहे.


टाऊन वेडींगच्या अंमलबजावणीसाठी

महापालिकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या फेरीवाल्यांचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजत असून फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीवरून महापालिकेला टार्गेट केले जात आहे. त्यामुळे या फेरीवाला धोरणाला मुहूर्तस्वरुप देऊन टाऊन वेडींग समितीसंदर्भात निर्णय घेऊन या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी निधी चौधरी यांच्यावर जबाबदारी टाकण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला असल्याचे म्हटले जात आहे.



हेही वाचा -

दहिसर रेल्वे स्थानकाने घेतला मोकळा श्वास, अतिक्रमणे दूर

फेरीवाला वादात राणे पुत्रांची उडी, निरुपम यांच्यावर जोरदार टीका



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा