Advertisement

फेरीवाला वादात राणे पुत्रांची उडी, निरुपम यांच्यावर जोरदार टीका


फेरीवाला वादात राणे पुत्रांची उडी, निरुपम यांच्यावर जोरदार टीका
SHARES

मालाडमध्ये फेरीवाल्यांनी मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांना मारहाण केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या मारहाणीनंतर मराठी विरुद्ध परप्रांतीय असा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. मात्र आता या वादात राणेंच्या दोन्ही मुलांनी उडी घेत थेट मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर जोरदार टीका केली.


निलेश-नितेशची निरुपम यांच्यावर जोरदार टीका -

निलेश राणे आणि नितेश राणे यांनी देखील वाहत्या गंगेत हात धुण्याचा प्रयत्न केल्याचे पहायला मिळत आहे. 'एका मराठी माणसाला एका अनधिकृत फेरीवाल्याने मारणं, हे कधीच सहन करणार नाही. मग तो कुठल्याही पक्षाचा असेल', असे म्हणत आमदार नितेश राणे मनसे कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. नितेश राणे यांनी मुंबई काँग्रेसवरही निशाणा साधला. ते म्हणाले, “मुंबई काँग्रेस म्हणजे उत्तर भारतीयांचा पक्ष असल्यासारखं वाटतंय आणि त्यांना मराठी माणसांची मतंही हवी असतात.”


निलेश राणेंच्या टीकेची पातळी घसरली-

तर दुसरीकडे माजी खासदार निलेश राणे यांनी देखील खालच्या दर्जाचे ट्विट संजय निरुपम यांच्यावर जोरदार प्रहार केला.



संजय निरुपम यांचा पटलावर -

नितेश राणे यांनी संजय निरुपम यांच्यावर टीका करताच संजय निरुपम यांनी देखील त्यांना जशास तसे उत्तर दिले आहे. नितेश राणे सध्या कोणत्या पक्षात आहेत, याचा शोध घ्यावा लागेल. असंही लहान मुलांच्या बोलण्यावर मी उगाच कशाला काय बोलावं, असा टोला त्यांनी लगावला.


काय आहे नेमकं प्रकरण?

मालाडमध्ये फेरीवाल्यांच्या मारहाणीत मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे हे जखमी झाले होते. त्यांना त्यानंतर उपचारासाठी कांदिवलीच्या ऑस्कर रुग्णालयात हलवण्यात आलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी सकाळी सुशांत माळवदे यांची भेट घेतली.
या संपूर्ण प्रकरणाला संजय निरुपम जबाबदार असल्याचा आरोप मनसेकडून केला गेला आहे. त्यानंतर फेरीवाला विरुद्ध मनसे असा वाद रंगला.


हेही वाचा - 

मालाडमध्ये मनसे विभाग अध्यक्षाला फेरीवाल्यांकडून जबर मारहाण


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा