Advertisement

इंटरनेट बंद, आयुक्त कार्यालयात नोंदवू देईनात बायोमेट्रीक हजेरी

महापालिकेतील इंटरनेट सेवा बंद असली तरी महापालिका आयुक्तांच्या कार्यालयातील इंटरनेट सेवा सुरळीत आहे. त्यामुळे मुख्यालयातील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात जावून बायोमेट्रिक हजेरी नोंदवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर होणारी ही गर्दी लक्षात घेऊन महापालिका आयुक्तांच्या कार्यालयामध्ये नोटीस लावून सर्व कर्मचाऱ्यांनी आपापल्या विभागांमध्ये लावलेल्या टॅबद्वारेच हजेरी नोंदवण्याच्या सूचना केल्या आहेत.

इंटरनेट बंद, आयुक्त कार्यालयात नोंदवू देईनात बायोमेट्रीक हजेरी
SHARES

मुंबई महापालिकेतील कामगार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे. परंतु मागील शुक्रवारपासून इंटरनेट सेवा सुरळीत नसल्याने बायोमेट्रीक हजेरी नोंदवण्यास कर्मचाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. एकमेव आयुक्तांच्या कार्यालयात इंटरनेट सेवा सुरळीत असल्याने त्याठिकाणी बायोमेट्रिक हजेरी नोंदवली जाते. परंतु सर्वच कर्मचाऱ्यांनी या हजेरीसाठी आयुक्तांचे कार्यालय गाठल्याने, आयुक्तांच्या कार्यालयानेही इतर खात्यातील कर्मचाऱ्यांना हजेरी नोंदवण्यास हरकत घेतली आहे. त्यामुळे बायोमेट्रिक करावी तरी कुठे? असा सवाल आता कर्मचारी करत आहेत.


हजेरीवरून संताप

बायोमेट्रिक हजेरी नोंदवली न गेल्यास कर्मचाऱ्यांचे पगार कापले जात आहेत. यापूर्वी अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या कामांच्या वेळा न नोंदवल्यामुळे सुमारे ३७ हजार कर्मचाऱ्यांचे पगार रोखले गेले होते. त्यामुळे बायोमेट्रिक हजेरीवरून कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला गेला होता. मात्र, बायोमेट्रिक हजेरीबाबत होणाऱ्या त्रासानंतरही कर्मचाऱ्यांनी या प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.


इंटरनेट सेवा धिमी

परंतु अनेक कार्यालयांमध्ये इंटरनेट सेवा सुरळीत नसल्याने बायोमेट्रिक हजेरी नोंदवण्यास कर्मचाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यापूर्वी मेट्रो रेल्वेने एमटीएनएलची केबल तोडल्याने त्याच्या जोडणीचं काम पूर्ण होईपर्यंत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी इंटरनेट सेवा अभावी नोंदवण्यास असंख्य अडचणींचा सामना करावा लागला होता. परंतु या प्रकरणातून महापालिका प्रशासन काहीही शिकलेले नाही.



एमटीएनएलची केबल तोडल्याने समस्या

मागील शुक्रवारपासून पुन्हा एकदा महापालिकेतील इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाली असून पुन्हा एकदा मेट्रो रेल्वेने एमटीएनएलची केबल तोडल्याने ही समस्या निर्माण होत असल्याचं सांगण्यात येत आहे. शुक्रपासून सुरु बंद असलेली ही इंटरनेट सेवा मंगळवारपर्यंत दुरुस्त होऊ शकली नव्हती. त्यामुळे बायोमेट्रिक हजेरीच नव्हे, तर महापालिकेचे कारभार चालत असलेली सॅप प्रणालीही पूर्णपणे बंद आहे.


अायुक्तांचं कार्यालय अपवाद

मात्र, महापालिकेतील इंटरनेट सेवा बंद असली तरी महापालिका आयुक्तांच्या कार्यालयातील इंटरनेट सेवा सुरळीत आहे. त्यामुळे मुख्यालयातील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात जावून बायोमेट्रिक हजेरी नोंदवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर होणारी ही गर्दी लक्षात घेऊन महापालिका आयुक्तांच्या कार्यालयामध्ये नोटीस लावून सर्व कर्मचाऱ्यांनी आपापल्या विभागांमध्ये लावलेल्या टॅबद्वारेच हजेरी नोंदवण्याच्या सूचना केल्या आहेत.


हजेरी नोंदवायची कुठे?

त्यामुळे हजेरी नोंदवावी तरी कुठे? असा सवाल कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. ज्या कालावधीत इंटरनेट सेवा बंद आहे, त्या कालावधीत वहीमध्ये हजेरी नोंदवून घेतली जावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. एका बाजूला इंटरनेट सेवा रामभरोसे चालली असून जोपर्यंत या सेवा सक्षम तसंच पर्यायी व्यवस्थेचा विचार होत नाही तोपर्यंत बायोमेट्रिक हजेरी बंद करण्यात यावी, अशीही मागणीही कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.



हेही वाचा-

महापालिका कर्मचाऱ्यांना कामावर अर्धा तास उशिरा येण्याची मुभा!

सर्व कर्मचाऱ्यांनी समान काम करावे म्हणूनच बायोमेट्रीक हजेरी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा