Advertisement

महापालिका कर्मचाऱ्यांना हवाय ४० हजार रुपये बोनस, लवकरच निर्णय होण्याची शक्यता

शासनावर दबाव आणण्यासाठी महापालिका कर्मचारी गुरूवारी बोनसच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले. कर्मचाऱ्यांच्या निवेदनानुसार बोनसबाबत लवकरच निर्णय घेऊ, असं आश्वासन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी समन्वय समितीला दिलं आहे.

महापालिका कर्मचाऱ्यांना हवाय ४० हजार रुपये बोनस, लवकरच निर्णय होण्याची शक्यता
SHARES

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी यंदा ४० हजार रुपये बोनस-सानुग्रह अनुदान मिळावं अशी मागणी उचलून धरली आहे. यावर अद्याप महापालिका प्रशासनाकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रशासनावर दबाव आणण्यासाठी महापालिका कर्मचारी गुरूवारी बोनसच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले. मुंबई महापालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली गुरूवारी कर्मचारी आझाद मैदानावर धडकले. तर कर्मचाऱ्यांच्या निवेदनानुसार बोनसबाबत लवकरच निर्णय घेऊ, असं आश्वासन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी समन्वय समितीला दिलं आहे.


गेल्या वर्षी इतका बोनस

गेल्या वर्षी महापालिका कर्मचाऱ्यांना १४,५०० हजार रूपये इतका दिवाळी बोनस मिळाला होता. यंदा मात्र कर्मचाऱ्यांनी अधिक बोनसची मागणी केली आहे. एकूण वेतनाच्या २० टक्के वा सरसकट ४० हजार रूपये इतका बोनस-सानुग्रह अनुदान द्यावं, अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने ही बाब लक्षात घेत कर्मचाऱ्यांची दिवाळी प्रकाशमय करण्यासाठी ४० हजार रुपये वा वेतनाच्या २० टक्के दिवाळी बोनस देण्याची कर्मचाऱ्यांची मागणी आहे.


१५६.७ कोटींची तरतूद

महापालिकेतील कामगार, कर्मचारी, अधिकारी, परिचारीका, परिसेविकास तंत्रज्ज्ञ, अभियंते, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अंशकालीन, कंत्राटी कामगार या सर्वांसाठी २०१७-१८ वर्षांसाठी १५६.७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार ४० हजार बोनस देणं सहज शक्य होईल, असा दावा समन्वय समितीकडून केला जात आहे. याच मागणीसाठी गुरूवारी दुपारी हजारो कर्मचारी रस्त्यावर उतरले होते. आता या कर्मचाऱ्यांना प्रतिक्षा आहे ती निर्णयाची. त्यानुसार लवकरच महापालिकेकडून बोनसची घोषणा होण्याची शक्यता आहे.



हेही वाचा-

महापालिकेचं वृक्ष प्राधिकरण बेकायदेशीरच, उच्च न्यायालयाचा दणका

कोस्टल रोड की भुलभुलैय्या, आत-बाहेर पडण्यासाठी तब्बल १८ मार्ग



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा