Advertisement

वाहनतळांचा वापर न करणाऱ्या बसवर कारवाई


वाहनतळांचा वापर न करणाऱ्या बसवर कारवाई
SHARES

मुंबईतील वाहतुककोंडीला शिस्त लावण्यासाठी महापालिकेनं 'नो पार्किंग'चा निर्णय घेतला असून, नो पार्किंग झोनमध्ये पार्क करणाऱ्या गाड्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्याशिवाय, महापालिकेनं मुंबईत सार्वजनिक वाहनतळं उपलब्ध करून दिली आहेत. मात्र, या ६१ ठिकाणांवरील वाहनतळांचा वापर न करता अजूनही अवजड वाहनांचे चालक आपल्या गाड्या अनधिकृतपणे रस्त्यांवर पार्क करत आहेत. अशा ५२ बस व १३ ट्रकवर महापालिकेनं दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईअंतर्गत तब्बल ९ लाख रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. यापैकी १ लाख ८० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

पार्किंग सुविधा उपलब्ध

रस्त्यांवर अनधिकृतपणं उभ्या करण्यात येणाऱ्या खाजगी बसट्रकमुळं वाहतुकीला अडथळा होऊन वाहतुकीचा वेग कमी होतो. त्यामुळं यावर महापालिकेनं उपाय म्हणून बेस्टचे २४ डेपो आणि ३७ बस टर्मिनल अशा ६१ ठिकाणी वाजवी दरात खाजगी बसट्रक इत्यादी अवजड वाहनांना पार्किंग सुविधा उपलब्ध करून दिलीमात्र, याचा वापर केला जात नाही

अनधिकृत पार्किंग

अवजड वाहनांच्या अनधिकृत पार्किंगसाठी १० हजार दंडतर टोचन शुल्क म्हणून ५ हजार याप्रमाणं एकूण रुपये १५ हजार एवढ्या रकमेची आकारणी करण्यात येत आहेज्या दिवशी टोचन करण्यात येईल, त्याच दिवशी गाडी सोडवून नेली नाहीतर प्रतिदिन २७५ रुपये विलंब आकार वसूल केला जात आहेही दंड आकारणी कमाल ३० दिवसांपर्यंत होणार आहेयानुसार एका अवजड वाहनावर रुपये २३ हजार २५० एवढा कमाल दंड आकारला जात आहे.

वाहनांवर कारवाई

१९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी उशिरापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईवेळी ५२ बस व १३ ट्रकवर कारवाई करण्यात आली आहेयामध्ये जी दक्षिण विभागात सर्वाधिक म्हणजे ११ अवजड वाहनांवर त्यानंतर के पूर्व विभागात १० वाहनांवर आणि एन विभागात ७ वाहनांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे



हेही वाचा -

सेन्सेक्सची १० वर्षातील सर्वात मोठी उसळी, पहा किती वाढला सेन्सेक्स



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा