सेन्सेक्सची १० वर्षातील सर्वात मोठी उसळी, पहा किती वाढला सेन्सेक्स

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलेल्या घोषणांमुळे देशातील शेअर बाजार जबरदस्त उसळले. मागील दहा वर्षातील सेन्सेक्समधील एका दिवसातील ही सर्वात मोठी वाढ आहे.

SHARE

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलेल्या घोषणांमुळे देशातील शेअर बाजार जबरदस्त उसळले. शुक्रवारी सेन्सेक्सने तब्बल १९०० अंकांची उसळी घेतली. मागील दहा वर्षातील सेन्सेक्समधील एका दिवसातील ही सर्वात मोठी वाढ आहे. तर निफ्टीनेही ५५० अंकांची विक्रमी वाढ नोंदवली. 

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी काॅर्पोरेट करात कपात करण्याची घोषणा केली. त्यामुळे देशातील कंपन्यांना आता २५.१७ टक्के कर द्यावा लागणार आहे. याआधी हा कर ३० टक्के होता. तर शेअर्स विक्रीवर आकारल्या जाणाऱ्या भांडवली लाभ करामध्ये (कॅपिटल गेन टॅक्स) सरचार्ज आकारला जाणार नाही. तसंच ज्या कंपन्यांनी ५ जुलैआधी बायबॅकची घोषणा केली होती त्यांच्यावरही कर आकारला जाणार नाही. शेअर बाजारासंबंधी या निर्णयांमुळे सेन्सेक्सने मागील १० वर्षातील एका दिवसातील सर्वात मोठी वाढ नोंदवली. सेन्सेक्स १९०३.८३ अंकांनी वाढून ३७ हजार ९९७ वर पोहोचला. तर निफ्टीही ५५१ अंकांची मोठी वाढ नोंदवत ११ हजार २५६ वर गेला. 

सेन्सेक्समध्ये इन्फोसिस वगळता सर्वच कंपन्यांनी मोठी वाढ नोंदवली. मारूती सुझुकी, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक, येस बँक, एल अँड टी,  हीरो मोटोकॉर्प आदी कंपन्यांच्या शेअर्समध्ये उसळी घेतली. हेही वाचा -
संबंधित विषय
ताज्या बातम्या

सेन्सेक्सची १० वर्षातील सर्वात मोठी उसळी, पहा किती वाढला सेन्सेक्स
00:00
00:00