Advertisement

मुंबईतील उद्यानांची वेळ वाढवली, दुपारी १२ ते ३ मध्येच राहणार बंद


मुंबईतील उद्यानांची वेळ वाढवली, दुपारी १२ ते ३ मध्येच राहणार बंद
SHARES

सद्यस्थितीत महापालिकेच्या अखत्यारितील मुंबईतील उद्यानांपैकी अनेक उद्याने दुपारी बंद असतात आणि संध्याकाळीही उशिरा उघडली जातात. त्यामुळे रहिवाशांना या उद्यानांचा लाभ घेता येत नाही. प्रत्येक उद्यान सकाळी आणि दुपारी बंद ठेवण्याच्या वेळा वेगवेगळ्या असल्यामुळे रहिवाशांना गैरसोय सहन करावी लागते. यावर उपाय म्हणून उद्याने खुल्या ठेवण्याच्या वेळा निश्चित करण्यात आल्या असून वेळेतही वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार सकाळी ९ ते १० वाजता बंद होणारी उद्याने दुपारी १२ वाजेपर्यंत खुली राहतील. तर चार तासानंतर दुपारी ३ वाजता पुन्हा खुली करण्यात येतील.


७५० उद्याने

मुंबई महापालिकेच्या उद्यान खात्याच्या अखत्यारित साधारणपणे ७५० उद्याने आहेत. या उद्यानांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे रविवार असो किंवा सार्वजनिक सुटी असो; आपल्या महापालिकेच्या उद्यानांना मात्र कधीही सुटी नसते. ही उद्याने वर्षातील ३६५ दिवस खुली असतात. मात्र, या उद्यानांच्या खुल्या राहण्याच्या वेळा वेगवेगळ्या होत्या.


'अशा' असतील नवीन वेळा

काही उद्यानांची सायंकाळी बंद होण्याची वेळ ही ७ ते ८ च्या दरम्यान होती. ज्यामुळे या उद्यानांचा मुंबईकरांना म्हणावा तसा उपयोग होत नव्हता. या सर्व बाबी लक्षात घेऊन ही उद्याने सकाळी ६ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते रात्री ९, यानुसार रोज १२ तास खुली ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत; त्यानुसार हा निर्णय घेऊन याबाबतचा सूचना संबंधितांना दिल्याचं जितेंद्र परदेशी यांनी स्पष्ट केलं.




रहिवाशांना फायदा

महापालिकेच्या ताब्यातील या मोकळ्या जागांचा रहिवाशांना अधिकाधिक उपयोग व्हावा तसंच सर्व उद्यानांच्या खुल्या राहण्याच्या वेळांमध्ये सुसूत्रता यावी; या हेतूने ही उद्याने रोज १२ तास खुली ठेवण्याचे आदेश आता देण्यात आल्याची माहिती महापालिकेचे उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.


देखभालीचे आदेश

उद्यानांमध्ये आवश्यक असणारी दैनंदिन देखभाल दुपारी १२ ते ३ या कालावधीत प्राधान्याने करण्याचे आदेशही संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहेत. त्याचबरोबर महापालिका उद्यांनाच्या प्रवेशद्वारांवर सुधारित वेळांचं फलक तातडीने लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्याची माहिती परदेशी यांनी दिली आहे.



हेही वाचा-

हँकॉक पुलाचा बांधकाम खर्च पावणे दोन कोटींनी वाढला

नायर रुग्णालयाविरोधात हायकोर्टात याचिका



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा