Advertisement

'या' आहेत पालिकेच्या नवरात्र आणि दांडियासाठी गाईडलाईन्स

कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थिती लक्षात घेता यंदा नवरात्रौत्सव, दुर्गापूजा आणि दसरा सण कसा साजरा करावा, याबाबत राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.

'या' आहेत पालिकेच्या नवरात्र आणि दांडियासाठी गाईडलाईन्स
SHARES

कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थिती लक्षात घेता यंदा नवरात्रौत्सव, दुर्गापूजा आणि दसरा सण कसा साजरा करावा, याबाबत राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत राज्य सरकारना मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

विशेष म्हणजे यंदा गरबा, दांडिया कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. दसऱ्याच्या दिवशी मात्र रावण दहन करता येणार आहे. मात्र, या कार्यक्रमाला गर्दी होणार नाही. सुरक्षित सामाजिक अंतर नियमावली पाळली जाणे गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.

काय आहेत मार्गदर्शक सूचना...

१) सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासन यांची धोरणानुसार पूर्वपरवनागी घेणं आवश्यक आहे.

२) कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता मर्यादित स्वरुपाचं मंडप उभारण्यात यावं.

३) या वर्षांचा नवरात्रोत्सव साध्या पध्दतीनं साजरा करणं अपेक्षित असल्यानं घरगुती तसंच सार्वजनिक

देवी मुर्तीची सजावट त्या अनुषंगानं करण्यात यावी.

४) देवीच्या मुर्तीची उंची सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट आणि घरगुती देवीच्या मुर्तीची उंची २ फूटांच्या मर्यादेत असावी.

५) या वर्षी शक्यतो पारंपारिक देवी मुताऐवजी घरातील धातु/संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे. मुर्ती शाडूची/पर्यावरण पूरक असल्यास तिचं विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावं.

६) विसर्जन घरी करणं शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा.

७) गरबा, दांडिया आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नयेत. त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/शिबीरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावं.

८) आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही तसंच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचं आणि तरतूदीचं पालन करण्यात यावं.

९) देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट आणि फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.

१०) देवीच्या मंडपांमध्ये निर्जंतुक करणाची तसंच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी.

११) प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन कराव. मास्क, सँनीटायझर इत्यादी पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

१२) देवीच्या आगमन, विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावं. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील,इमारतीतील सर्व घरगुती देवी मुर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये.



हेही वाचा

नो मास्क, नो इंन्ट्री! मास्‍क नसल्‍यास ‘बेस्‍ट बस’ सह टॅक्‍सी, रिक्षामध्‍ये प्रवेश नाही

मुंबईत उपाशीपोटी झोपणाऱ्यांसाठी 'मुंबईकर्स मोहब्बतखाना'

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा