Advertisement

काळ्या यादीतील कंपनीला कचरा उचलण्याचं कंत्राट


काळ्या यादीतील कंपनीला कचरा उचलण्याचं कंत्राट
SHARES

कुर्ला एल वॉर्डातील कचरा गोळा करून वाहून नेण्यासाठीचं कंत्राट हे पुन्हा एकदा काळ्या यादीतील संलग्न असलेल्या कविराज एमबीबी वेस्ट मॅनेजमेंट कंपनीला मिळालं आहे. परंतू या कंपनीनं न्यायालयात सुरु असलेल्या वादविवादांची माहिती लपवल्यामुळे हे कंत्राट वादात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ही माहिती लपवली गेल्याचं उघड झाल्यास हे कंत्राट रद्द होऊ शकतं, असं बोललं जात आहे.


७ वर्षाचं कंत्राट

गोराईसह महालक्ष्मी कचरा हस्तांतरण केंद्रातील कचरा उचलण्याचं कंत्राट कविराज एमबीबी कंपनीला मिळालं असून या दोन्ही प्रस्तावांना स्थायी समितीची मान्यता मिळालेली आहे. त्यानंतर आता पुढील ७ वर्ष कुर्ला परिसरातील कचरा गोळा करून त्याची डम्पिंग ग्राऊंडपर्यंत विल्हेवाट लावण्याचं काम कविराज एमबीबी वेस्ट मॅनेजमेंट कंपनी करणार अाहे.


वादविवादाची माहिती लपवली

आतापर्यंत विश्वशक्ती व कविराज इन्फ्राटेक या काळया यादीतील कंपनीची संलग्न कंपनी असलेली कवीराज एमबीबी वेस्ट मॅनेजमेंट ही चर्चेत राहिलेली आहे. परंतु त्यानंतरही या कंपनीला दोन कामे बहाल केली अाहेत.  परंतु कुर्ला येथील कचरा वाहून नेण्याच्या कंत्राट कामांमध्ये वादविवादासंदर्भात कवीराज एमबीबी यांनी सध्या सुरु असलेल्या एका याचिकेसंदर्भातील माहिती दिली आहे. मात्र, २०१३मध्ये या कंपनीची संलग्न असलेल्या ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीविरोधात न्यायालयात याचिका दाखल आहे. या कंपनीबाबत न्यायालयात असलेल्या वादविवादाची माहिती लपवल्याची बाब समोर येत आहे.

निविदा रद्द ?

यापूर्वी अशाप्रकारे वादविवादाची माहिती लपवल्याबद्दल जी-उत्तर, एन आणि एस या विभागाच्या कंत्राट कामाच्या निविदांमध्ये पात्र ठरलेल्या कंपन्यांना बाद करून फेरनिविदा मागवण्यात आली आहे. त्यामुळे कविराज एमबीबीला हा निकष लावल्यास आणि वादविवाद लपवल्याची माहिती समोर आल्यास ही निविदाच रद्द होऊ शकते, असं बोललं जात आहे.



हेही वाचा -

एल्फिन्स्टन स्थानक बनले प्रभादेवी

मुंबईकरांसाठी 'वाघिणी'चं दूध!



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा