एल्फिन्स्टन स्थानक बनलं प्रभादेवी

मुंबईकरांना अाता पुढील स्थानक प्रभादेवी अशी घोषणा ऐकायला मिळणार अाहे. हा बदल बुधवारी १८ जुलैला रात्री १२ वाजतापासून लागू होणार आहे.

SHARE

मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील एल्फिस्टन रोड या स्थानकाचं अखेर नामकरण प्रभादेवी करण्यात आलं आहे. अनेक वर्षांपासून नाव बदलण्याची मागणी करण्यात येत होती. सर्वात पहिल्यांदा १९९१ साली सध्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या स्थानकाला प्रभादेवी नाव देण्याची मागणी केली होती.

बुधवारी रात्रीपासून बदल

२०१६ च्या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारकडून नाव बदलण्याला मंजुरी देण्यात आली होती. राज्य सरकारच्या मंजुरीनंतर केंद्र सरकारनेही त्या ठरावाला हिरवा कंदील दाखवला होता. त्यानुसार मुंबईकरांना अाता पुढील स्थानक प्रभादेवी अशी घोषणा ऐकायला मिळणार अाहे. हा बदल बुधवारी १८ जुलैला रात्री १२ वाजतापासून लागू होणार आहे.


स्थानकाचा PBHD कोड

तर प्रभादेवी या स्थानकाचा PBHD असा कोड असणार आहे, याची नोंद घेण्याची विनंती पश्चिम रेल्वेकडून करण्यात आली आहे. यापूर्वी मुंबईमध्ये वापरात असलेल्या एम इंडिकेटरमध्ये प्रभादेवी असंच नाव होतं. मात्र स्थानकाला एल्फिन्स्टन असं नाव असल्याने अनेक नवीन प्रवाशांचा गोंधळ उडत होता. तो मात्र आता होणार नाही.हेही वाचा -

मुंबई-नागपूर अंतर होणार ६ तासांचं, हायस्पीड रेल्वेचा प्रस्ताव

पश्चिम माटुंग्याच्या पादचारी पुलाला तडे गेल्याने बंदसंबंधित विषय
ताज्या बातम्या