Advertisement

धारावीत सापडले डासांच्या उत्पत्तीचे ६५ अड्डे!

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या किटकनाशक विभागाच्या पथकांनी शुक्रवारी धारावीतील प्रत्येक गल्ल्यांमध्ये शिरून डेंग्यू आणि हिवतापाच्या अळ्या नष्ट केल्या. ही मोहीम आठ दिवस चालणार अाहे.

धारावीत सापडले डासांच्या उत्पत्तीचे ६५ अड्डे!
SHARES

पावसाळ्यात साथीच्या आजारांचं प्रमाण वाढत असून धारावीत डेंग्यू आणि मलेरियाच्या तापाने (हिवताप) थैमान घातलं आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या किटकनाशक विभागाच्या पथकांनी शुक्रवारी धारावीतील प्रत्येक गल्ल्यांमध्ये शिरून डेंग्यू आणि हिवतापाच्या अळ्या नष्ट केल्या. ही मोहीम आठ दिवस चालणार असून पहिल्याच दिवशी डेंग्यूच्या अळ्यांचे ६५ अड्डे आढळून आल्यामुळे धारावीत डेंग्यूचा रेड अलर्ट जाहीर करण्याची वेळ आरोग्य खात्यावर आली आहे.


३३५४ घरांची पाहणी

महापालिकेच्या कीटक नियंत्रण खात्यानं धारावी परिसरातील डास उत्पत्ती स्थळे नष्ट करण्यासाठी 'कोंबिंग ऑपरेशन' सुरू केलं आहे. यासाठी ५२ कर्मचाऱ्यांची पलटण तैनात करण्यात आली आहे. धूर फवारणी यंत्र, औषध फवारणी यंत्र यासारख्या आयुधांसह सुसज्ज असणाऱ्या या पलटणीद्वारे डास उत्पत्ती स्थळांचा नायनाट करण्यात येत आहे. २५ जुलै ते ३ ऑगस्ट या दरम्यान करण्यात येणाऱ्या 'कोंबिंग ऑपरेशन'च्या पहिल्याच दिवशी ३ हजार ३५४ घरांची पाहणी करण्यात आली. यापैकी ६६ घरात डेंग्यू वा हिवताप पसरविणाऱ्या डासांची उत्पत्ती आढळून आली असल्याची माहिती महापालिकेचे कीटकनाशक अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी दिली आहे.

चमूत ३ ते ५ सदस्य 

या 'कोंबिंग ऑपरेशन' मध्ये नारळाची करवंटी, टायर, थर्माकोल, अडगळीच्या वस्तू, झाडांच्या कुडयांखालील ताटल्या, फ्रीजचा डिफ्रॉस्ट ट्रे, ए.सी., रिकामी शहाळी, ताडपत्री, पन्हाळी यासारख्या विविध वस्तूंची पाहणी करून डासांचे अड्डे नष्ट करण्यात आले. धारावी परिसरातील घरांमध्ये प्रवेश मिळणे देखील कीटक नियंत्रण खात्याच्या कर्मचा-यांना कठीण व्हायचे. त्यामुळे प्रभावी डास नियंत्रणासाठी तीन दिवसांचं 'कोंबिंग ऑपरेशन' सुरु करण्यात आलं. प्रत्येक चमूत ३ ते ५ सदस्य असून ते धारावीतील घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधून नागरिकांना डास नियंत्रणाचे महत्त्व पटवून देत आहेत.


नागरिकांना मार्गदर्शन

कर्मचारी घरातील सदस्यांसमवेत घरातील कानाकोपरा धुंडाळत त्यांना डास उत्पत्तीस्थळे कशी शोधावीत व ही स्थळे तयार होऊ नये, यासाठी काय करावे, याचंही मार्गदर्शन करत आहेत. ही उत्पत्तीस्थळे प्रामुख्याने पाण्याचे ड्रम, 'बॉक्स ग्रील'मधील अडगळीच्या वस्तू, ताडपत्री, पन्हाळी, टायर, थर्माकोल इत्यादींमधील साचलेल्या पाण्यात आढळून आली.



हेही वाचा -

खासगी संस्थांना दिलेली रुग्णालये ताब्यात घ्या, नगरसेवकांची मागणी

मेडिकल प्रवेशासाठी ‘डोमिसाइल’च्या अटी योग्यच - उच्च न्यायालय



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा