Advertisement

चुनाभट्टी प्रसुतीगृहात आधारकार्ड असेल तरच एन्ट्री


चुनाभट्टी प्रसुतीगृहात आधारकार्ड असेल तरच एन्ट्री
SHARES

मुंबई महापालिकेच्या चुनाभट्टी येथील मिनाताई ठाकरे प्रसुतीगृहात दाखल होण्यासाठी येणाऱ्या गरोदर महिलांना प्रवेशच दिला जात नाही. आधार कार्ड असेल तरच तुम्हाला प्रसुतीगृहात दाखल करून घेतले जाईल, असे तेथील कर्मचारी वर्गाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनेक महिलांना खासगी प्रसुतीगृहाचा आधार घ्यावा लागत आहे. गरीब गरोदर महिलांनी या महापालिकेच्या प्रसुतीगृहात येवू नये तर मग कुठे जावे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.


आधार कार्डअभावी प्रवेश नाकारला

चुनाभट्टी येथील महापालिकेच्या मिनाताई ठाकरे प्रसुतीगृहात दाखल होण्यास येणाऱ्या गरोदर महिलांना आधार कार्डअभावी प्रवेश दिला जात नसल्याची तक्रार सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांना प्राप्त झाली. त्यानंतर त्यांनी लागलीच हे प्रसुतीगृह गाठून आधारकार्डची सक्ती करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फैलावर घेत गरोदर महिलांना त्वरीत दाखल करून घेतले.

या प्रसुतीगृहातील कर्मचारी हे उपचार घेण्यासाठी येणाऱ्या महिलांशी उद्धटपणे वागत असून तुम्ही कोणालाही घेऊन या नाही तर मीडियाकडे जा, परंतु आधार कार्ड नसेल तर आम्ही तुम्हाला प्रवेश देणार नाही, अशा शब्दात महिलांना हीन वागणूक देत असल्याचा आरोप डॉ. सईदा खान यांनी केला.


रुग्णांकडे डॉक्टरांचे दुर्लक्ष?

या प्रसुतीगृहातील डॉक्टर आणि लॅब टेक्निशियम हे साध्या कपड्यात वावरत असून रुग्ण सेवेकडे त्यांचे लक्षच नसल्याचे त्यांनी सांगितले. मग कोट्यवधी रुपये खर्च करून महापालिकेने ही सुविधा गरीब रुग्णांना उपलब्ध करून दिली. त्याचा काय उपयोग? असा प्रश्न त्यांनी केला. यापूर्वी काही महिलांना अशाचप्रकारे प्रवेश न दिल्यामुळे काही महिला खासगी प्रसुतीगृहात दाखल झाल्या. पण ज्यांची ऐपत नव्हती अशा गरीब महिलांची प्रसुती ही रस्त्यावरच करावी लागली, असेही त्यांनी सांगितले.



हेही वाचा - 

केईएम रुग्णालय रुग्णांच्या नातेवाईंना म्हणते, स्वच्छता राखा


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा