Advertisement

अग्निसुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष, हबीब एज्युकेशन ट्रस्टमधील ५ हजार विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

मुंबईतील चिंचबंदर येथील हाबीब इस्माइल एज्युकेशन ट्रस्टमध्ये शिकणाऱ्या जवळपास ५ हजार विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. याचं कारण म्हणजे या ट्रस्टमध्ये अग्निसुरक्षा नियमांचे पालन केलं जात नाही.

अग्निसुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष, हबीब एज्युकेशन ट्रस्टमधील ५ हजार विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
SHARES

मुंबईतील चिंचबंदर येथील हबीब इस्माइल एज्युकेशन ट्रस्टमध्ये शिकणाऱ्या जवळपास ५ हजार विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. याचं कारण म्हणजे या ट्रस्टमध्ये अग्निसुरक्षा नियमांचं पालन केलं जात नाही. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही महापालिकेनं याविरोधात पावलं उचलेली नाहीत. या एज्युकेशन ट्रस्टच्या पहिल्या मजल्यावर शाळा आणि कॉलेज आहे. तर, ट्रस्टच्या गच्चीवर एक रेस्टॉरंट असून तळमजल्यावरील खुल्या जागेत एलपीजी सिलेंडरचा वापर करून जेवणं बनवलं जातं. हे सर्व या ट्रस्टमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी धोकादायक असून, कोणत्याही क्षणी इथं दुर्घटना होण्याची शक्यता आहे.


रेस्टॉरंट आणि धुम्रपान क्षेत्र 

हबीब इस्माइल एज्युकेशन ट्रस्ट इमारतीच्या गच्चीवर रेस्टॉरंट आणि धुम्रपान क्षेत्र आहे. हे कायद्याचं उल्लघंन केल्यासारखं आहे. देशात धूम्रपान विरोधी कायद्यानुसार, शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात धूम्रपान करण्यास मनाई आहे. तसंच, कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या १०० मीटरच्या आत तंबाखू उत्पादनांची विक्री करण्यासही मनाई आहे. याबाबत मुंबई अग्निशमन दलाकडं तक्रार दाखल करण्यात आली आहे. 'मुंबई लाइव्ह'कडं या तक्रारीची प्रत असून, यामध्ये ट्रस्टच्या तळमजल्यावरील खुल्या जागेत एलपीजी सिलिंडरचा वापर करून खाद्यपदार्थ बनवलं जात असल्याचं स्पष्ट झालं आहे.

अनधिकृत बांधकाम

इमारतीच्या तळमजल्यावर मान्सून शेड (छप्पर) बसविण्यात आलं असून, हे बांधकाम अनधिकृत आहे. तसंच, याठिकाणी २ पाण्याच्या टाक्या देखील बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या-येण्यासाठी मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं

विविध व्यवस्था

या इमारतीच्या गच्चीवर बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून, पॅन्ट्री आणि टॉयलेटची देखील व्यवस्था केली आहे. परंतु, या बांधकामाची कोणतीही कागदपत्रं ट्रस्टकडं नाहीत. इमारतीच्या संपूर्ण गच्चीचं एका खेळाच्या मैदानात रुपांतर करण्यात आलं आहे. तसंच, त्याचा उपयोग 'केसर बाग ट्रस्ट'च्या उपक्रमांसाठी केला जातो. त्याशिवाय, गच्चीवर सर्वत्र जाळी बसविण्यात आली असून, हे बांधकाम अनधिकृत आहे. त्यामुळं कोणत्याही आपत्कालीन परिस्थिती विद्यार्थ्यांना गच्चीवर आणणं अशक्य आहे.

एनओसी नाही

खाद्यपदार्थ बनविण्यासाठी अग्निशमन दलाच्या सीएफओ विभागाचं 'ना हरकत प्रमाणपत्र' (एनओसी) असणं बंधनकारक आहे. परंतु, तक्रारीनुसार इमारतीच्या तळमजल्यावरील खुल्या जागेत खाद्यपदार्थ बनविण्यासाठी एनओसी न घेतल्याची माहिती समोर येत आहे.हेही वाचा -

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार

बिग बॉस कोण उंचावणार 'मनोरा विजयाचा'?संबंधित विषय
Advertisement